पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
नांदेड , दि. २२ :- आज दिं.२१ रोजी नांदेड मुख्य पोस्ट ऑफिसच्या वतीने आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवसा निमित्ताने नांदेडचे डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांनी काळेश्वर महादेवला गंगोत्रीचे गंगा जलाने अभिषेक करून गंगा जल बाटली नागरिकारिकासाठी विक्री करण्यासाठी उपलब्ध करून दिले.यावेळी नांदेडचे साहयक डाक अधीक्षक संजय आबेकर ,मुख्य पोस्ट मास्तर डी. एम, जाधव हे उपस्थित होते.
या गंगा जल नवीन गृहप्रवेश, सत्यनारायण पूजा,देवाचे अभिषेक, व पूजेसाठी पवित्र मानले जाते.
या करिता भारत सरकारने पोस्ट ऑफिस मार्फत गंगा जल विक्री करण्यासाठी महत्वाच्या पोस्ट ऑफिस मध्ये केंद्र सुरू करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी गंगा जलचा लाभ घ्यावा असे अहवान करण्यात आले.