Home बुलडाणा बुलडाणा येथील वरीष्ठ पत्रकार जितेंद्र कायस्थ यांना मातृशोक

बुलडाणा येथील वरीष्ठ पत्रकार जितेंद्र कायस्थ यांना मातृशोक

79

 

 

बुलढाणा, डिजिटल मिडिया परिषदेचे विभागीय सचिव तथा दैनिक जनसंचलनचे संपादक जितेंद्र कायस्थ यांच्या मातोश्री प्रयागबाई देवचंद कायस्थ यांचे आज रविवार, 29 मार्च रोजी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देव घरातील दिव्याने त्यांच्या साडीचा पदर जळाला यामध्ये त्यांचे अंग चाळीस टक्के भाजले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर बुलढाणा येथे व नंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये उपचार करण्यात आले. परंतु आज 29 मार्च रोजी रात्री 9.50 वाजता त्यांनी आज वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुले, सुना नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.