
प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा
जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील जागतिक सर्परक्षक, सर्पमित्र, वनिता जगदेवराव बोराडे यांचा इंदोर मधील प्रसिद्ध साहित्यकार आणि इतिहास संशोधक डॉ. एन.एन.जी.काळे यांनी वनिताताईंच्या कार्याचा गौरव म्हणून इंदोर मध्ये सत्कार केला.याप्रसंगी त्यांच्यासोबत हरिभक्त परायण डी.भास्कर, सांज शक्तीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रा.दिलीप नाईकवाड,सौ.अरुणा नाईकवाड, बालसर्पमित्र मानव बोराडे,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
साहित्यिकार डॉ.काळे यांनी लिहिलेल्या ‘The Achievers’ या पुस्तकात सर्परक्षक वनिताताई बोराडे यांच्या जागतिक कीर्तीची नोंद पुस्तकात घेण्यात आलेली आहे तसेच भारतातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची दखल घेऊन त्यांच्या कार्याविषयी माहिती छापलेली आहे हे पुस्तक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित देशातील १७ मुख्यमंत्री,६० भारतीय विश्वविद्यालय,
आणि १६ विदेशी ग्रंथालयामध्ये या पुस्तकाच्या प्रती वाचकांना माहितीसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून ठेवण्यात आलेल्या आहेत,विदर्भातील व मराठवाड्यातील विद्यापीठांचे कुलगुरू यांना सप्रेम भेट देण्यासाठी सुद्धा त्यांनी सांजशक्तीचे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडे प्रति सोपवलेल्या आहेत.
श्रीमती वनिताताई बोराडे यांना जागतिक पहिल्या सर्परक्षक व सर्पमित्र भारतात राष्ट्रपतींकडून सन्मानित झालेले आहेत.आज पर्यंत त्यांनी ७१ हजार सापांना जीवदान दिलेलं असून त्यांना सुरक्षित पणे जंगलामध्ये त्यांच्या अधिनिवासामध्ये सोडलेले आहे याप्रसंगी वनिताताई बोराडे यांनी सर्पाविषयी संपूर्ण माहिती असलेले सोयरे वनचरे २०२६ चे कॅलेंडर उपस्थित सर्व साहित्यकार व डॉ.एन.जी.काळे यांना कॅलेंडर भेट दिले.डॉ काळे यांनी सुद्धा लिहिलेली पुस्तके उपस्थितीना भेट म्हणून दिली डॉ काळे यांनी त्यांच्या जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत प्रा.दिलीप नाईकवाड त्यांनी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून सतत सहा वर्ष महाविद्यालयात कालखंडात केलेल्या कार्याची माहिती घेऊन त्याबद्दल त्यांनी प्रा. नाईकवाड यांचा याप्रसंगी सत्कार केला.सौ अरुणा गायकवाड यांनी एक वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यक्रम अधिकारी म्हणून केलेल्या कार्याचा सुद्धा गौरव केला इंदोर येथील देवीअहिल्या यांच्या कार्यावर आणि जीवन चरित्रावर लिहिलेले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे पुस्तक सर्वांना सप्रेम भेट दिले. पुणे येथील विश्वशांती दूत डॉ.सुधीर तारे यांना त्यांनी ‘The Achievers’ हे पुस्तक समर्पित केलेले असून हे सर्वांना सप्रेम भेट दिली.











































