Home वाशिम पत्नीची विहिरीत उडी…..वाचविन्यासाठी गेलेल्या पतीचाही दुर्दैवी मृत्यू…

पत्नीची विहिरीत उडी…..वाचविन्यासाठी गेलेल्या पतीचाही दुर्दैवी मृत्यू…

839

 

फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील सवासनी गांवातील पती-पत्नी चा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे.सवासीन गांवातील अमोल जगताप (वय 45 वर्षे) आणि त्यांची पत्नी सीमा जगताप (वय 35 वर्षे)यांच्या मध्ये काल सायंकाळ दरम्यान किरकोळ वाद झाला. त्या नंतर पत्नी सीमा जगताप ने घरा पासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत उडी मारली तिच्या पाठो-पाठ तिचा पती अमोल जगताप ही गेला आणि त्याने पत्नीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली मात्र पत्नी ला वाचविण्यासाठी गेलेल्या पती आणि त्याची पत्नी या दोघांचा ही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप घरून निघून गेल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता सीमा जगताप हिची चप्पल शेतातील विहिरी बाहेर दिसली त्या नंतर त्या विहिरीत सीमा जगताप आणि अमोल जगताप चा शोध घेण्यात आला मात्र अंधार पडल्याने त्या विहिरीतील शोध कार्य बंद करण्यात आले.दि.२६ ला सकाळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने शोधकार्य सुरू केल्या नंतर त्या विहिरीतुन पती पत्नीचा मृत देह शोधून वर काढण्यात आला.पती पत्नी मधील किरकोळ वादातून विहिरीत बुडून पती आणि पत्नी च्या झालेल्या मृत्यू मुळे त्यांचा एक 15 वर्षाचा मुलगा तसेच एक 12 वर्षांची मुलगी पोरकी झाली आहेत.या घटनेमुळे सवासीन गांवात शोक कळा पसरली असून मंगरुळपीर पोलीस पुढील तपास करत आहेत.