
वाशीम
सद्या राज्यातील सर्व कृषि उतपन्न बाजार समिति मध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. काही व्यपारी वल्ली च्या नावा खाली शेतकरयांची फसवणूक करून कमी भावात सोयाबीन खरेदी करत आहे पावसा मुळे उशीराने मळणी केलेल्या तसेच मळणी करून विक्रीसाठी थांबलेले शेतकरी आता सोयाबीन मार्केट मध्ये घेऊन येत आहेत. ओलावा कमी असलेल्या सोयाबीन ला 4500 पासून 5000 रुपयापर्यंत सरासरी दर मिळत आहे.
दि. 07/ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथिल लिलावाच्या काही पावत्या सोशल मिडिया वर वायरल झाल्या असून या मुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दि. 07/ नोव्हेंबर रोजी वाशिम मध्ये 8000 रुपये पेक्षा अधिक दर मिळाल्याच्या पावत्या सोशल मिडिया वर पहायला मिळाल्या होत्या. याबाबत आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधि फूलचंद भगत यांनी प्रत्यक्ष बाजार समितीकडे विचारणा केली असता असे समजले की उन्नती 1135 बिजवाई सोयाबीन (बियाणे साठी वापरणार) ला 8000 रुपये दरम्यान दर मिळाल्याचे स्पष्ट झाले. लवकरच सोयाबीन चे भाव थोड्या प्रमाणात वाढनार असल्याचे ही काही व्यापारयानि माहिती देतांना सांगितले आहे ,













































