
भगवानराव साळवे ,
सिंदखेडराजा
तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी पोलीस मदत केंद्रात शांतता समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. आगामी ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सव विसर्जन या दोन्ही महत्त्वाच्या सणांचा कालावधी एकमेकांच्या जवळ आल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार गजानन करेवाड होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“उत्सव जोडण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नाहीत. समाजातील सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे. पोलीस प्रशासनाला साथ दिल्यास कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही. मिरवणुकीत डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, जेणेकरून सणाचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व वृद्धिंगत होईल.”प्रत्येक नागरिकाने शांतता व बंधुभाव राखून सण साजरे करावेत. पोलीस प्रशासन नेहमीच जनतेसोबत उभे आहे. एकतेच्या माध्यमातून आपण संपूर्ण तालुक्यासाठी आदर्श निर्माण करू शकतो.” असे ठाणेदार करेवाड यांनी सांगितले
यावेळी पत्रकार भगवान साळवे यांनी मलकापुर पांग्रा हे पोलिसांच्या यादीमध्ये संवेदनशील गाव कसे काय आले माहित नाही वास्तविक आमचे गाव सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे त्यामुळे आम्ही बिना पोलीस संरक्षणा मध्ये सर्व सामाजिक उत्सव साजरे करून दाखवू शकतो त्यासाठी कोणताच कायदा आणि स्वयंसेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची गॅरंटी घेतो त्यासाठी आम्ही हे सर्व गावकरी बॉण्ड वर लिहून देतो, असे सांगितले यावेळी पोलीस निरीक्षक पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे , पत्रकार फकीर महोम्मद पठाण मौलाना साबीर यांनी आपल्या भाषणातून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत शांततेने उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले.
या बैठकीस पोलीस निरीक्षक पाटील, दुय्यम ठाणेदार रवींद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बरुड, जमादार निवृत्ती पोकळे, जमादार डोईफोडे, खुपिया विभाग प्रमुख नितिन राजे जाधव, सरपंच यादव टाले, माजी सरपंच साबेर पठाण, अरुण मखमले गुलशेर खासाब, मोहम्मद यारखा, आयुबखान पठाण, पत्रकार भगवान साळवे, डॉ. गंगाराम उबाळे, फकीरमत पठाण, वसीम शेख, प्रल्हाद देशमुख, पवन मगर शहेबाज खान गोपाल टाले दिनकर बावरे आदी मान्यवरांनीही सहभाग घेतला.
बैठकीत ईद उत्सव समिती व गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विविध समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































