Home बुलडाणा चिखली तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून एका युवकाचा मृत्यु ,

चिखली तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून एका युवकाचा मृत्यु ,

526

चिखली तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून एका युवकाचा मृत्यु ,

अमीन शाह

बुलडाणा ,

चिखली तालुक्यातील शेलगाव आटोल या गावी आज दुपारी एक युवक आपल्या शेळयांना चारा आणण्यासाठी गाव लगत असलेल्या शेतात गेला होता जवळच असलेल्या नदिला पाण्याचा परवाह जोराने सुरु होता आश्यताच त्या युवकाचा पाय घसरला व तो नदीच्या परवाहत वाहून गेला या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील चेतन वंसता बोर्डे वय 22 वर्ष हे आपल्या बकऱ्यांना चारा आणण्यासाठी 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी चारा आणण्यासाठी बारा ते एक वाजेच्या दरम्यान जंगलात गेले असता नदीला पूर आलेला होता चारा घेत असतांना नदीच्या पुरात पाय घसरून पाण्यात पडले पाण्याचा प्रवाह बरोबर अंदाजे एक किलोमीटर पर्यंत वाहून गेले व सुभाष सखाराम मिसाळ यांच्या शेताजवळ असलेल्या सिमेंट बंधाऱ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला सदर माहिती चिखली चे तहसीलदार संतोष काकडे यांना मिळतात त्यांनी महसूल अधिकारी यांना पाठवून त्यांचा पंचा समक्ष पंचनामा केला आहे आणि चिखली तालुक्यातील जनतेला आव्हान केले आहे की सध्या सतत धार पाऊस सुरू आहे त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच राहावे महत्वाचे काम असले तरच घराबाहेर पडा आणि बाहेर रस्त्याने जाताना सुद्धा पाण्याचा अंदाज घ्यावा घड़लेल्या घटने मुळे गावात दुःखाचे वातावरण असून हळहळ व्यक्त केली जात आहे ,