
इन कॅमेरा पीएम अहवाल पुनश्च करण्यात यावा.
ॲड.सतीशचंद्र रोठे,
अमीन शाह
बुलढाणा:
बहुचर्चित पंकज देशमुख हत्या प्रकरणाची चौकशीची मागणी घेऊन रान उठवीणाऱ्या श्रीमती सुनीता देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या दरम्यान जळगाव जामोद मध्ये घरीच नजर कैदेत ठेवणे या घटनेचा निषेध.पंकज देशमुख यांची हत्या झाल्याचे असंख्य पुरावे आहेत. सदर पुराव्यांचा आधार घेत पुनर चौकशी सुरू करावी. इन कॅमेरा झालेल्या पीएम रिपोर्टची इतर वैद्यकीय तज्ञाकडून चौकशी करून पीएम रिपोर्ट बनवण्यात यावा.अशी मागणी करत आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी 14 ऑगस्ट ला सायंकाळी श्रीमती सुनिता पंकज देशमुख यांच्या उपोषण मंडपाला उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भेट देत केली आहे.
तर शासन प्रशासनाने राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या जिल्ह्यात लढणाऱ्या जिजाऊ लेकीची थट्टा करू नये त्यांना भेटण्यासाठी इतरत्र बोलवणे कितपत योग्य आहे..? असा सवाल उपस्थित करत शासन प्रशासनाने उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी केली.
मागण्यांची त्वरित पूर्तता करावी अन्यथा आझाद हिंद आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा यावेळी दिला आहे.
उपोषण मंडपाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्ता अँड जयश्रीताई शेळके, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, ग्रामस्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे पाटील, अल्पसंख्यांक बिछडावर्तीचे शेख सईद, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकुब पठाण आदींनी उपोषण मंडपाला भेट देत मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी लावून धरली.
___
जयश्रीताई शेळकेंची पालकमंत्र्यांसोबत चर्चा.
आमरण उपोषणाच्या अनुषंगाने उभाठा गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी उपोषण मंडपातून पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी चर्चा करीत उपोषण मंडपाला भेट देत प्रकरण हाताळण्याची विनंती केलीआहे











































