Home यवतमाळ मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्तीसाठी 20 जुलैला परीक्षा

मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्तीसाठी 20 जुलैला परीक्षा

200

आठ केंद्रांवर तीन हजार विद्यार्थी देणार परीक्षा

यवतमाळ – राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून “मातोश्री प्रमीलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्तीच्या दुसऱ्या पर्वात उद्या रविवार, २० जुलै रोजी दिग्रस, दारव्हा आणि नेर या तालुक्यांतील आठ परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी तब्बल तीन हजार विद्यार्थी मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

ही योजना ना. संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात वाटचाल करू इच्छिणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक आधार देणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेतून एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अमरावतीतील विदर्भ आयएएस अकॅडमी येथे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासोबत दरमहा पाच हजार रुपयांचे विद्यावेतन देखील दिले जाईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातून 20 हून अधिक विद्यार्थ्यांची विविध शासकीय पदांवर निवड झाली आहे. मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्तीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळाल्याचे चित्र आहे.