यवतमाळ जिल्ह्यातील तलाठी संवर्गाच्या आर्थिक व सेवाविषयक विषयक मागण्याबाबत वारंवार १५ ते १६ निवेदने सादर करण्यात आली तसेच वेळोवेळी जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केल्यावरही फक्त आश्वासना व्यतिरिक्त काहीही पदरात पडले नाही त्यामुळे संदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे जिल्ह्यातील सर्व तलाठी संवर्गाची व विदर्भ पटवारी संघाची धारणा झाल्यामुळे नाईलाजास्तव खालील मुद्द्यावर पुढील प्रमाणे बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्यात येत आहे.
1. जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी. गेल्या पंधरा वर्षापासून अद्यावत नसणे
2. जिल्ह्यातील तलाठी संवर्गाच्या सार्वत्रिक व विनंती बदल्यातील अनियमिततेबाबत.
3. कालबाह्य झाले लॅपटॉप व प्रिंटर बदलवून मिळणेबाबत.
4. जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची वेतन निश्चिती व वेतन पडताळणी बाबत.
5. मराठा आरक्षणाचे मानधन मिळणे बाबत.
6. तलाठी कार्यालयातील पायाभूत सुविधांबाबत.
7. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाबाबत.
8. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामाचे परिश्रमिक मानधन मिळणेबाबत.
9. वार्षिक मूल्यांकन अहवाल ची प्रत मिळण्याबाबत.
10. गौनखनिज पथकांमध्ये संरक्षण पुरविणे बाबत.
11. जिल्ह्यातील तलाठी यांना आदिवासी प्रोत्साहनपर भत्ता मिळनेबाबत.
12. 2053 लेखा सिर्षका अंतर्गतची रक्कम अदा करणे बाबत.
13. वेब मॅनेजर पदाचा कार्यभार कमी करणेबाबत. या व तलाठी संवर्गाच्या इतर मागण्या साठी जिल्हा प्रशासनास दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने आंदोलनाची नोटीस देण्यात येऊन दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व तलाठी यांनी लॅपटॉप व डी एस सी टोकन प्रशासनाकडे जमा करण्यात आले.तसेच आंदोलनाच्या नोटीस मधील नमूद प्रमाणे दिनांक 24 सप्टेंबर 2024 पासून जिल्ह्यातील सर्व तलाठी बेमुदत सामूहिक रजेवर गेलेले असून जिल्ह्यातील महसुली शासकीय कामकाज प्रभावित झालेले आहे.तरीही जिल्हा प्रशासन अजूनही गाढ झोपेत असल्याने तलाठी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. सदर आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने वेळेत सोडवणूक न केल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील. सदर आंदोलन विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष श्री. बाळकृष्ण गाढवे यांचे मार्गदर्शनात व श्री राजू मानकर जिल्हाध्यक्ष जिल्हा शाखा यवतमाळ यांचे नेतृत्वात होणार असल्याची माहिती जिल्हा सचिव भरत पिसे यांनी दिली.विदर्भ पटवारी संघ नागपुर जिल्हा शाखा यवतमाळ ने पुकारलेल्या आंदोलनातील मागण्या न्याय्य व रास्त असून यवतमाळ जिल्ह्यातील तलाठी संवर्गाच्या मागण्याची दखल जिल्हा प्रशासनाने लवकर घ्यावी.संवर्गाच्या संयमाचा अंत पाहु नये. अन्यथा आम्हाला आंदोलनाची व्याप्ती व तीव्रता वाढवावी लागेल व विदर्भातील ११ ही जिल्हे यवतमाळ जिल्ह्याच्या समर्थनार्थ आंदोलनात उतरेल व त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील.