Home यवतमाळ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

156

यवतमाळ –  अनुसूचित जमातीच्या इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव दि.30 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जात पडताळणीसाठी संबंधित विद्यार्थ्यांनी https://etribevalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अचुक अर्ज, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक नमुद करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रस्ताव मुदतीत सादर करण्यासाठी संबधित शाळा, महाविद्यालयांनी शासन निर्णय दि.10 डिसेंबर 2019 चे पालन करावे, असे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष मनोज चव्हाण यांनी केले आहे.