Home मराठवाडा निलजगाव येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन…!

निलजगाव येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन…!

47
0

रवि गायकवाड

बिडकीन , दि. ०७ :- आज दि.०७ रोजी पैठण तालुक्यातील बिडकीन नजीक असलेले निलजगाव याठिकाणी महाराष्ट्र शासन उपकृत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व सिग्मा व युनायटेड सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि EDNY NGO व BGNMMयांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आजारपणावर मोफत तपासणी व समुपदेशन मार्गदर्शन सल्ला व औषधी वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी EDNY NGO व BGNMM संस्थेच्या वतीने व निलजगाव ग्रामपंचायत च्या वतीने सर्व सिग्मा हॉस्पिटल च्या डॉक्टर टिमचा सत्कार करण्यात आला.ह्या शिबिरात 230 रुग्णांची मोफत तपासणी करून औषधी देण्यात आली व 19 गरजू रुग्णाला पुढील उपचारा साठी सिग्मा हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले ह्या वेळी सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद चे मुख्य संचालक डॉ उन्मेष टाकळकर सर यांनी लाईव्ह कॉन्फरन्स द्वारे नागरिकांना मार्गदर्शन केले व योजने विषयी माहिती दिली.
याप्रसंगी सिग्मा व युनायटेड सिग्मा हॉस्पिटल यांच्या वतीने गजानन महाजन,डॉ.नितीन जाधव,डॉ.उषा रणेर,डॉ.सुप्रिया घोडके,राजेश पौळ,शाहिन पठाण,अनिरुद्ध खंडागळे,आमेर शेख,ताराचंद चव्हाण यांची टिम होती.याप्रसंगी रामदास डोळस(सरपंच)संतोष मोगल (उपसरपंच ) दत्ता मोगल,संजय रोठोड,उद्धव नजन,शाहिन पठाण यांची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता सुनिल महाजन,रमेश शिंदे,जयराम गायकवाड,सईदा पठाण,रविंद्र गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Unlimited Reseller Hosting