Home यवतमाळ यवतमाळ वाशिम मध्ये उद्योजक येण्यास उत्सुक – खा.संजय देशमुख

यवतमाळ वाशिम मध्ये उद्योजक येण्यास उत्सुक – खा.संजय देशमुख

22

यवतमाळ –  महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी औद्योगिकरण होणे आवश्यक आहे, यासाठी विविध उद्योग यवतमाळ वाशिम जिल्ह्यात आणावेत व यासाठी राज्य सरकार सर्व मदत करेल, असे आश्वासन यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी भारतीय उद्योग परिसंघाच्या बैठकीत नवी दिल्ली येथील द ललित हॉटेल येथे बुधवारी केले. 

भारतीय उद्योग परिसंघाने (CII) आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील नवनिर्वाचित खासदारांना ग्वाही दिली की, महाराष्ट्र राज्यात आज अनेक ठिकाणी औद्योगीकरण होणे गरजेचे आहे. ज्यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. या मध्ये सरकारकडून आवश्यक असलेल्या सर्व स्तरावर उद्योजकांना सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार मा.संजय देशमुख यांनी दिले. तसेच या बैठकीत यवतमाळ वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व कापसाचे उत्पादन होते. यावर आधारित उत्पादन तयार करण्यात यावे, अशी सूचना या वेळी खासदार संजय देशमुख यांनी उद्योजकांना केली.

या कार्यक्रमास खा.अरविंद सावंत, खा.धनंजय महाडिक, खा.ओमराजे निंबाळकर, खा.धैर्यशील मोहिते  पाटील, खा.नरेश म्हस्के, खा.अनुप धोत्रे तसेच सीआयआयचे कामत ग्रुपचे विठ्ठल कामत, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, सुला वाइनचे सुजित पैठणकर, रजनीकांत बालरा, विनय जॉय, राजेश कपूर, सुनील किर्तक, अजय सप्रे आदी उपस्थित होते.