Home बुलडाणा निवासी नायब तहसीलदार डॉ अस्मा मुजावर सुट्टीच्या दिवशी पोहचल्या बांधावर ,

निवासी नायब तहसीलदार डॉ अस्मा मुजावर सुट्टीच्या दिवशी पोहचल्या बांधावर ,

20

 

सिंदखेड राजा भगवान साळवे
शेतातील रस्ते अडविल्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या दिवसात शेतकऱ्यांना पेरणी पाण्यासह मशागतीच्या काम आणि इतर पेरणी पश्चात कामे करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती तर काही शेतकऱ्यांची शेती पडीत पडण्याच्या मार्गावर होत्या त्यामुळे तात्काळ रस्ते खुले करून देण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात प्रकरण दाखल करून दाद मागितली होती याची दखल घेत कर्तव्यदक्ष महिला अधिकारी असलेल्या निवासी नायब तहसीलदार डॉ आसमा मुजावर यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन दोन वेगवेगळ्या प्रकरणात शेतकऱ्याची चर्चा केली आणि अर्जदार आणि गैर अर्जदार शेतकऱ्यांमध्ये समेट घडून आणवत नायब तहसीलदार डॉ अस्मा मुजावर यांनी प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत पर्याय रस्ता ऑन द स्पॉट उपलब्ध करून दिल्याने दोन वर्षापासून त्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत आहे विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दोन प्रकरणात शेतकऱ्यांना रस्ता करून खुला करून देण्यात आला
याबाबत माहिती अशी की सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी उगले मौजे जयपुर येथील अर्जदार श रोहित आडे आणि इतर 50 शेतकऱ्यांनी नंबरी बांधावरून रस्ता खुला करून द्यावा यासाठी तहसील कार्यालयात अपील दाखल केली होती तर येथीलच गोविंद पवार आणि इतर 13 शेतकऱ्यांनी वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा यासाठी प्रकरण दाखल केले होते आणि पावसाळ्याचे पेरणी पाण्याचे आणि निंदन खुरपने डवरणे तन नाशक फवारणी खत टाकले आदीसह शेतीचे विविध कामे असल्याने आणि काही शेतकऱ्यांना रस्ता अडवल्यामुळे या रस्त्यावरील शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती त्यामुळे सदर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन रस्ता खुले करून देण्यात यावे यासाठी प्रकरण दाखल केले होते याची दखल घेत निवासी नायब तहसीलदार डॉ आसमा मुजावर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुट्टीच्या दिवशी रविवारला मंडळ अधिकारी संतोष गायकवाड तळाठी श्रीमंत पांडव ज्ञानेश्वर ढाकणे कोतवाल आकाश माघाडे यांना सोबत घेऊन (पांग्रीउगले) मौ. जयपूर अर्जदार रोहिदास दगडू आडे व इतर 50 यांचे नंबर बांधाने रस्ता मागणी प्रकरणात तसेच गोविंद शाहू पवार व इतर 13 यांचे वहिवाटी रस्ता मागणी प्रकरणात प्रत्यक्ष मोक्यावर हजर राहून वरील दोन्ही प्रकरणात स्थळपाहणी करण्यात आली. तसेच अर्जदार शेतकरी यांना शेतीची मशागत करण्यासाठी अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये आपसी समेंट घडवून आणून प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला. त्यामुळे या दोन्ही प्रकरणातील 60 ते 70 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे