Home यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रूपये लाटले

मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रूपये लाटले

135

 पाच व्यवस्थापक अटकेत, पोलीस कोठडीत रवानगी…!

यवतमाळ : मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील कोट्यावधीचा अपहार करणाऱ्या पाच व्यवस्थापकाना अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या शाखा हिवरा येथील हिवरा शाखेशी संलग्न असलेल्या महागाव तालुक्यातील ग्रामविकास विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिवांना हाताशी धरून चिलगव्हान, पोहडुळ, लेवा, खडका, धनोडा, शिरपुर,हिवरा येथील संस्थेचे सभासद नसलेल्या लोंकाच्या नावे बनावट पेंमेट आर्डर तयार करून त्यांच्या खात्यात 1कोटी 87 लाख 67 हजार 182 रूपये विविध खात्यात वळती करून बॅंकेची फसवणुक करून हिवरा शाखेतील व्यवस्थापकाने आरोपी तत्कालीन शाखा व्यवस्थापक मुकूंदा राजाराम चवरे रा.गांधी नगर पुसद, संतोष नंदुसिंग राठोड, तत्कालीन शाखा व्यवस्थापक रा.इटावा वार्ड पुसद, शाखा निरिक्षक निशिकांत प्रभाकर श्रीरामे रा.द्वारका नगरी पुसद तसेच फरार आरोपी वसुली अधिकारी सुरेश पंजाबराव भरवाडे रा.बस स्टँण्ड चौक यवतमाळ ,शाखा निरिक्षक विष्णु रतन आडे रा.महागाव यांचे विरूद्ध कलम 409,420,468,471,472,34 अतर्गंत महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्यातील फरार आरोंपीचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन शोध सुरू होता दरम्यान आज आरोपी पोलीसांच्या गळाला लागले आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मध्यवर्ती सहकारी बॅंकेत पिक कर्ज वाटपात कोट्यावधी चे घोटाळे झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसापुर्वी पिक कर्ज वाटपाचा आढावा घेतला असता त्यामध्ये बॅंक व्यवस्थापकांनी खोटी माहीती पुरविली आहे.त्यामुळे जिल्हातील अनेक शाखा व्यवस्थापकांचे धाबे दणाणले आहे.
बाॅक्स
सहकारी बॅंकेच्या व्यवस्थापकांना संचालकाचा छुपा पाठींबा
जिल्हयातील सहकारी बॅंकेच्या संचालकांनी आपल्या मर्जीतील शाखा व्यवस्थापक तसेच निरिक्षकांच्या मध्यतंरीच्या आपल्या सोयी नुसार नियुक्त्या केल्या होत्या त्यातुनच अनेक संचालकांनी पिक कर्ज वाटपात मुळ लाभार्थ्यांना डावलुन थेट सदस्य नसलेल्या बिगर सातबारा धारकांना पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. सोसायट्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना डावलल्याने खरीप हंगामात दारोदार भटकावे लागत आहे.
बाॅक्स
आर्णी सहकारी बॅंकेतील कोट्यावधी रूपयाचा घोटाळा दडपला
आर्णी शाखेत झालेल्या कोट्यावधी रूपयाच्या घोटाळ्यात काही आरोपींना अटक करून आर्थीक गुन्हे शाखेने कागदपत्रे जप्त केली त्यानंतर या प्रकरणातील आरोपीची सुटका झाली मात्र या प्रकरणाचा अद्यापही सुरू असुन कोणत्याही संचालकाला अटक करण्यात आली नाही. विशेष म्हणजे डझणावर सबळ पुरावे असताना आर्थीक गुन्हे शाखेच्या तत्कालीन निरिक्षकाला सहकार क्षेत्रातील एका मोठ्या नेत्याने आपल्या फार्महाऊसवर बोलावुन प्रकरण सेटलमेंट केले त्यामुळे या प्रकणावरही तोच कित्ता गिरविला जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.