Home यवतमाळ दिवंगत राजीवजींच्या शहीद दिनानिमित्त युवक काँग्रेस आउटरीच सेलतर्फे अन्न व फळे वाटप

दिवंगत राजीवजींच्या शहीद दिनानिमित्त युवक काँग्रेस आउटरीच सेलतर्फे अन्न व फळे वाटप

142

यवतमाळ – आज दिनांक 21/5/23 रोजी आधुनिक भारताचे शिल्पकार आणि माहिती क्रांतीचे जनक, भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी जी यांच्या स्मरणार्थ शहीद दिनानिमित्त युवक काँग्रेस आऊटरिच सेल चे राष्ट्रीय चेअरमेन आदरणीय चंडी ओमन यांच्या नेतृत्वाखाली गरीब गरजू रुग्णांना जेवण व फळ यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वाटप करण्यात आले . शहीद दिनानिमित्त मोहम्मद असीम अली संघटक समन्वयक वेस्टर्न इंडिया, युथ काँग्रेस आउटरीच सेल आणि मित्र परिवार यांनी विशेष संकल्प केला की 21/5/23 ते 21/5/24 या कालावधीत संपूर्ण वर्षाच्या पहिल्या रविवारी (रविवार) अन्नदान केले जाईल.

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अधिवक्ता जयसिंग चव्हाण, कौमी तंजीमचे जिल्हाध्यक्ष मिर्झा वसीम बेग, ताहेर अहमद उर्फ ​​बाबा भाई, सुनंदा ताई उंबरकर, मुजाहिद खान, किशोर भगत, मनोहर उंबरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.