Home यवतमाळ माहूर शहराच्या सुरवाती पासूनच रस्त्या १०० फुटाचा व्हावा…!

माहूर शहराच्या सुरवाती पासूनच रस्त्या १०० फुटाचा व्हावा…!

135
माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट
 अयनुद्दीन सोलंकी 
————————–
घाटंजी :- माहूर शहराच्या सुरवाती पासूनच महामार्गाचा रस्ता १०० फुटाचा व्हावा या मागणी साठी आज दिनांक १९ रविवार रोजी माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
तीर्थक्षेत्र माहुर (जिल्हा – नांदेड) शहरातुन जात असलेल्या राष्ट्रीय राज्य मार्ग क्रमांक १६१ ए चे काम ना. नितीन गडकरी यांच्या सुचने नंतर ८० फुटांवरून १०० फुटाचा करण्यात येत आहे. परंतु सदर रस्ता हा माहूर शहरातील सुरवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून ते ग्रामीण रुग्णालयांपर्यंत न करता टी पॉइंट ते ग्रामीण रुग्णालय पर्यंत १०० फुटाचा करण्यात येत आहे. महत्वाची गरज असलेल्या शहराच्या सुरवाती पासून ते श्री. रेणुका देवी कडे जाणारा रस्ता हा नाली सह ८० फुटाचा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरीत २० फुट रुंदीवर अतिक्रमण होऊ शकते.
तीर्थक्षेत्राच्या शहराला वाढती वाहतूक बघता हा रस्ता आरुंद करण्यात येत आहे. तसेच होत असलेल्या कामात मध्यभागी सि.सि. रस्ता व दोन्ही बाजुला डांबरीकरणचे सर्व्हीस रोड अशी रचना आहे. मात्र माहुर शहराला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ हा वळण रस्ता अस्तित्वात असल्यामुळे सर्व्हीस रोडची आवश्याकता नाही. त्यामुळे शहराच्या हद्दीत पुर्ण १०० फुट क्षमतेने रस्ता विकसित करावा तसेच मध्यभागी दुभाजक करुन त्यात सुशोभिकरण, दोन्ही बाजुने रस्त्याच्या हद्दीवर नाली व उर्वरीत पुर्ण रस्ता हा सि. सि. करावा त्या मुळे शहराच्या वैभवात भर पडेल, अशी मागणी माहुरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन केली आहे. सोबतच श्रीक्षेत्र माहूर शहरात वाहन तळाच्या व्यवस्थेकरिता 10 एकर गायरान जमिन नगर पंचायत माहूरला विनामुल्य उपलब्ध करुन देण्यासाठी व माहूर येथे नांदेडच्या गुरुतागद्दीच्या धरतीवर भव्य भक्तनिवास बांधकाम करण्यासाठीं शिफारस करावी, या मागणीचे निवेदन देत माहूर भेटीचे निमंत्रण ही दोसानी यांनी गडकरी यांना दिले आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमित येवतिकर, बालाजी कोंडे, अब्दुल रहेमान शेख अली यांची उपस्थिती होती.