Home विदर्भ अमरावती-‘एमडी’ची ऑन कॉल विक्री; डिलिवरी मॅन अटकेत.

अमरावती-‘एमडी’ची ऑन कॉल विक्री; डिलिवरी मॅन अटकेत.

57

मनिष गुडधे

अमरावत. इतवारा बाजारात ‘एमडी’ची विक्री करणाऱ्या डिलिवरी मॅन अटक करण्यात आली. त्याच्याकडून २२.५ ग्रॅम मेफेड्रॉन ‘एमडी’ ड्रग्स जप्त करण्यात आले. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली. मोहम्मद वजीद वल्द अब्दुल नासीर कुरेशी (४०) रा. गवळीपुरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मोहम्मद वजीद हा शुक्रवारी इतवारा बाजार परिसरातील एका गुळ भंडारजवळ एमडी ड्रग्ज विक्री करीत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने इतवारा बाजार गाठून मोहम्मद वजीदला अटक केली. त्याच्याकडून २२.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थासह एकूण १ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मोहम्मद वजीदविरुद्ध शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूआप्पा बाहेणकर, फिरोज खान, सतीष देशमुख, सुरज चव्हाण, निवृत्ती काकड, सुधीर गुडधे यांनी केली. एमडी ड्रग्स म्हणजे काय?
कॉलेजच्या मुला-मुलींमध्ये ‘म्यॅव म्यॅव’ आणि ‘एम-कॅट’ अशा सांकेतिक भाषेत ‘फेमस’ असललेल्या ‘एमडी ड्रग’ या अंमली ‘विशिष्ट डिलिव्हर्स’ च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे. मेफ, बबल्स, ड्रोन, म्यॅव म्यॅव आणि एम-कॅट अशी त्याची वेगवेगळी टोपणनावे आहेत. युवा वर्गाला व्यसनाधीन करणारा हा पदार्थ शरीरासाठी घातक आहे. डिसेंबर २०२२ मध्ये देखील सीपींच्या विशेष पथक व नागपुरी गेट पोलिसांनी एमडी ड्रग्स जप्त केले होते.