
पाटणबोरी — झरीजामणी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे .गड असलेले गाव म्हणजे सतपल्ली म्हणून ओळखले जात होते. आता ग्रामपंचायतच्या निवडणुका जवळ आल्याने गाव . गावातील जनतेच्या संयुक्त मताने गावातून डायरेक्ट सरपंचाची निवड असल्याने गावात भाजप पक्षाची बांधणी करून सरपंच निवडायचा असल्याने अनेक काँग्रेसचे गावातील दिग्गज कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या पक्षात पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी पक्षप्रवेश करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते सुनिल विजय सिंदमवार ग्रा.पं. सदस्य, हनमंतु बोल्लीवार उपसरपंच सतपल्ली, गजानन नारायण लक्षट्टीवार, गौतम हिरामण हस्ते, राजेंद्र नारायण सिडाम, गजानन भंडारवार, केशव आरेवार, भिमन्ना कोतपेल्लीवार, विक्रांत कोतपेल्लीवार व गावातील इतर लोकांचा भाजपा पक्षात पक्षप्रवेश
हा पक्षप्रवेश वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांच्या उपस्थित व मनोज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संजय शर्मा यांच्या सोबत शेकडो काँग्रेस कार्यकर्ते भाजपा मध्ये पक्षप्रवेश केलेले आहे.
यावेळी ह्या कार्यक्रमाला उपस्थित भाजपा झरी तालुकाध्यक्ष सतीश नाकले, झरीजामणी पंचायत समितीचे माजी सभापती राजेश्वर गोंड्रावार, सुरेश मानकर माजी पं.स.सदस्य, अशोकभाऊ बोदकुरवार माजी कृ.उ.बा.समिती सभापती, सतीशभाऊ दासरवार, दिलीप पाटील राऊत, मोहनराव चुक्कलवार, नारायणराव लक्षट्टीवार, कुश केमेकार, सचिन दुम्मनवार,किशोर पाईलवार, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सतपल्ली गावातील नागरिक मोठ्या संख्येने पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित होते .











































