Home विदर्भ दोन्ही ट्रकच्या मध्ये सापडून युवक ठार…!

दोन्ही ट्रकच्या मध्ये सापडून युवक ठार…!

12
0

कोरपना तालुका – मनोज गोरे

चंद्रपुर , दि. २९ :- आज सकाळी अंबुजा सिमेंट कंपनीत कामावर जात असताना प्रफुल्ल खामनकर (28)रा.गडचांदुर या युवकाचा दोन्ही ट्रकच्या मध्ये सापडून अपघात झाला यात तो जागीच ठार झाला पोलीस सुत्राच्या माहिती नुसार ट्रक क्रमांक एमएच 34 बिजी 7767 हा ट्रक गीटी भरुन गडचांदूर कडुन राजुरा कडे जात होते याचा पाठीमागे मोटारसायकल क्रमांक एमएच 34 – 8838 मोटारसायकल घेऊन प्रफुल्ल खामनकर हा आपल्या अंबुजा सिमेंट येथे कामावर जात होता.

याच मोटारसायकल मागे एमएच 34 – बीजी 7786 ही सुद्धा ट्रक (हायवा) गीटी भरुन गडचांदूर कडुन राजुरा कडे जात होते दोन्ही हायवा राजुरा कडे जात असताना 7767 ट्रक ने अचानक ब्रेक मारला त्या मागे असणारा मोटारसायकल चालकाने ही ब्रेक मारला परंतु मोटारसायकल मागे असणारा ट्रक क्रमांक एमएच 34 बीजी 7786 या ट्रक ने सरळ समोरील ट्रकला धडक दिली यात दोन्ही ट्रकच्या मध्ये मोटारसायकल सापडली यात मोटारसायकल चालक जागीच ठार झाला प्रफुल्ल खामनकर हा अंबुजा सिमेंट कंपनीत पंडीत काळे यांच्या कडे सुपरवायझर म्हणून काम करीत होता घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनेची पंचनामा करण्यात आला व मृतकाला गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले घटना घडताच हायवा चालक घटनास्थळावरून फरार झाला असुन गडचांदूर पोलीस चालकाचा शोध घेत असुन पुढील तपास सुरू आहे.