Home मराठवाडा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे  आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे  आवाहन

66
0

राजेश भांगे

नांदेड , दि. २९ :- राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. राज्यात शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु) असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. सन 2018 – 19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. संबंधितानी ऑनलाईन अर्जात आपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या आर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रासह अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावे. ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करण्यात आलेल्या कागदपत्राशिवाय इतर कोणतेही अधिकची कागदपत्रे अर्जासोबत जोडण्यात येवू नये. ऑनलाईन व्यतिरीक्त इतर कागदपत्रे जोडलेली असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कागदपत्रांचा गुणांकनासाठी विचार केला जाणार नाही याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहिती, पात्रतेचे निकष व नियमावली आदी माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय 24 जानेवारी 2020 चे अवलोकन करावे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in व www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य पुरस्कार (संघटक/ कार्यकर्ते), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला संघटक/ कार्यकर्ते व महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहिसी पुरस्कर, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडु), एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार आहेत.
ज्येष्ठ क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/ कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी सबंधित अशा 60 वर्षावरील व्यक्तीने क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व पणाला लावून आपले जीवन क्रीडा विकासासाठी व्यतीत केले आहे, अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीचा गौरव करण्याचा दृष्टीने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी अर्ज मागविण्यात येत नसून अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीची माहिती नामांकनाद्वारे केंद्र शासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील. याबाबत अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातुर विभाग लातुर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधु- 9423140617 यांच्याशी संपर्क साधाव, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विलास चव्हाण यांनी केले आहे.