मराठवाडा

जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक, ग्रामीण पोलीसांची कामगिरी

औरंगाबाद ग्रामीण पोलीसांची कामगिरी

अब्दुल कय्यूम

औरंगाबाद , दि. 28 :- जानेवारी १४ डिसेंबर २०१९ रोजी फिर्यादी नामे विनोद बाबू पवार वय २८, व्यवसाय शेती, रा.निरगुडी तांडा, ता. खुलताबाद याने तक्रार दिली होती १३ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास शेत गट नं. १३ येथे शेतातील गोठ्यात बैलांना बांधून घरी गेले असता दूस-या दिवशी सकाळी सात वाजता गोठ्यात बैल दिसले नाही. याची माहिती सरपंच सुनील पवार व गावातील लोकांना दिली. पोलीस ठाणे खुलताबाद येथे तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. गावातील इसम नामे नारायण जगण माळे, रा. भिलवाडा, निरगुडी ता. खुलताबाद याने त्याचे साथीदार नामे सलीम उर्फ सलमान उस्मान पठाण, रियाज उर्फ बबलू उस्मान पठाण दोन्ही निरगुडी यांनी जनावरांची चोरी करुन विक्री केली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २५ जानेवारी या दोघांना अटक केली आहे. विनोद पवार यांचे शेतातील दोन बैल भगवान कहाटे यांच्या गाडीत भरुन चाळीसगांव येथील बाजारात विक्री केली आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोउपनि संदीप सोळंके, पोह विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, राजेंद्र खरात, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, पोलीस ठाणे खुलताबाद येथील पोना वाल्मिक कांबळे, हनुमंत सातपुते यांनी केली आहे.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...