
रावेर( शेख शरीफ)
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तर्फे आयोजित पहिले शिव राज्यस्तरीय बाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिनी २७ फेब्रुवारी २०२२ गोदावरी मंगल कार्यालय मुक्ताईनगर येथे थाटात संपन्न झाले या संमेलनाचे विशेष अतिथी माजी महसूल तथा कृषी मंत्री एकनाथराव खडसे नियोजित अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. श्रीकांत पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. जगदीशदादा पाटील उद्घाटक डॉ. सतीश तराळ संमेलनाचे मुख्यआयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर संयोजक हकीम आर चौधरी व राज्यातील विविध जिल्ह्यातून साहित्यिक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे संमेलन विविध उपक्रमांनी यशस्वी झाले.

सकाळी ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होऊन उद्घाटन कू.तनिष्का रूले यांच्या स्वागत गीताने व पारंबी येथील भागवत बेलदार व किसंन गोंधळी व १८ महिलांच्या गोंधळ गीताने या संमेलनाची सुरुवात झाली या प्रसंगी उपस्थितांनी या कलाकारांना मनापासून दाद दिली. डॉ. जगदीशदादा पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचा २८ विद्यार्थ्यांचा विविध वेशभूषा या ग्रंथ दिंडी सोहळ्यात आकर्षण ठरले त्यासाठी सौ. सुनिता वाडेकर मॅडम यांनी परिश्रम घेतले प्रसंगी या संमेलनाचे विशेष अतिथी माजी महसूल कृषिमंत्री श्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या दमदार शैलीमध्ये आणि विविध काव्यमय रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली व तात्यासाहेब कुसुमाग्रज यांचा फोटो ठेवून याप्रसंगी पूजन केले याविषयी त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. त्यांनी शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे मनापासून कौतुक केले व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित संमेलनाचे मुख्य आयोजक शिवचरण उज्जैनकर व सर्व टीमचे सुद्धा एकनाथ खडसे यांनी मनापासून अभिनंदन केले.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.जगदीशदादा पाटील यांनी सुद्धा या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून व आदिशक्ती व संत मुक्ताईच्या पावन भूमीमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या सर्व साहित्यिक रसिक व पुरस्कारार्थी यांचे मनापासून स्वागत केले.
तर संमेलनाचे उद्घाटक डॉ. सतीश तराळ यांनी आपल्या शैलीत मराठी भाषा गौरव दिनाच्या अनुषंगाने आपली मते मांडली.मराठी व्याकरण, बोली सौंदर्य, साहित्य परंपरा याचा उहापोह आपल्या भाषणातून व्यक्त केला.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील यांनी समयोचित असे अध्यक्षीय भाषण करून उपस्थित आबालवृद्धांची मने जिंकली. या प्रसंगी त्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिनी हा सोहळा आयोजित केला असल्याने आयोजकांचे अभिनंदन केले . त्यांनी आपल्या भाषणातून संस्कृत सुभाषितांची पेरणी करून उपस्थितांची दाद मिळवली
याप्रसंगी तापी-पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्काराचे वितरण सुद्धा प्रसंगी करण्यात आले तसेच तालुक्यातील ३० विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. प्रसंगी प्रा. राजकुमार कांकरिया श्रीमती ज्योतीताई राणे आदींनी सुरेल सूत्रसंचालन केले
दुपारच्या परिसंवादामध्ये परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. अनंता सूर यांच्या उपस्थितीत जळगाव डाएटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील कोल्हापूर येथील प्रकाश पाटील सौ. नसीम जमादार सांगली येथील सौ मेघा पाटील आदींनी डिजिटल माध्यमांचा वाचन संस्कृती वरील आक्रमण या विषयावर परिसंवादात आपले स्पष्ट विचार व्यक्त केले. परिसंवादाचे सुरेल सूत्रसंचालन पुणे येथील प्रा. सुनील धनगर यांनी केले.
कथाकथनाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निकाळे यांच्या उपस्थितीत सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे हिवराआश्रम येथील बबन महामुने कोल्हापूर येथील सौ. नसीम जमादार चिखली येथील एडवोकेट विजयकुमार कस्तुरे मुक्ताईनगर येथील प्रमोद पिवटे जयवंत बोदडे बुलढाणा येथील डॉ. शुभांगी करपे आदींनी या कथा कथनामध्ये सहभाग नोंदवला याचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी बडगुजर जळगाव यांनी केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगसद्गुरु डॉ कृष्णदेव गिरी यांचे विठ्ठल मंत्र टाळी विज्ञान या विषयी उपस्थितांना त्यांनी योगाचे महत्त्व पटवून टाळीचे महत्त्व पटवून प्रोत्साहित केले. शाहिर मनोहर पवार यांनी शाहिरी कला सादर केली त्यानंतर उर्वरित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी राज्यातील विविध जिल्ह्यातील ११३ मान्यवरांना तापी-पूर्णा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्यानंतर दुपारच्या सत्रात महाराष्ट्र लोककलेत जळगाव येथील नायब तहसीलदार सौ. प्राजक्ता अंगद राठोड, आरोही, याशिका कांकरिया आर्यन वाडेकर, कु. तनिष्का शामकांत रुले आदींनी सुंदर गीत गाऊन उपस्थितांची दाद मिळवली तर रात्री आठ ते दहा या वेळात ज्येष्ठ साहित्यिक कवी तुळशीराम बोबडे अकोला यांच्या अध्यक्षतेखाली नियोजित कविसंमेलन उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी ३० ते ३५ कवींनी सहभाग नोंदवला तीन तास कविसंमेलन रंगले यामध्ये प्रा. राजकुमार कांकरिया व श्रीमती ज्योतीताई राणे यांनी सुरेल सूत्रसंचालन केले कवी संमेलनामध्ये पुणे येथील सौ. रुपालीताई चिंचोलीकर चिखली मेहकर येथील एडवोकेट विजय कुमार कस्तुरे मनोहरराव पवार प्राचार्य पंढरीनाथ शेळके डॉ. शुभांगी करपे श्रीरामपूर येथील डॉ. शिवाजीराव काळे चांदुर बिस्वा येथील शालिग्राम वाडे कोल्हापूर येथील परशराम आंबी मुंबई येथील श्रीमती पुष्पा चौधरी खामगाव येथील प्रा.देवबा पाटील नांदुरा येथील रुस्तमजी होणाले मुक्ताईनगर येथील प्रमोद पिवटे अ. फ.भालेराव जयवंत बोदडे आर. के. ढोले मधुकर पोतदार कोल्हापूर येथील सौ. प्रणिता तेली सुरेश लोंढे आदींनी सहभाग नोंदवला. शेवटी कवी संमेलनाचे अध्यक्ष तुळशीराम बोबडे यांनी कविसंमेलनात सहभागी मान्यवरांना उपस्थितीती प्रमाणपत्र देऊन गौरव केला शेवटी या संमेलनाचे कार्याध्यक्ष साहित्यिक प्रमोद पिवते यांनी सर्व मान्यवर, सौजन्यआर्थी पुरस्कारार्थी यांचे आभार मानले. संमेलन यशस्वीतेसाठी शिवचरण फाऊंडेशनचे कार्यकारणीतील पदाधिकारी सदस्य या संमेलनाचे संयोजक हकीम आर. चौधरीं जळगाव व बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य विविध जिल्ह्यातील समन्वयक यांनी परिश्रम घेतले.











































