Home नांदेड धर्माबाद रेल्वेस्थानकावर विधवा महिलेला लुटून अत्याचार

धर्माबाद रेल्वेस्थानकावर विधवा महिलेला लुटून अत्याचार

361

धर्माबाद : ता. प्रतिनिधी राहुल वाघमारे

धर्माबाद येथे रेल्वे स्थानकावरून विधवा महिलेला बोगीत नेऊन तिच्यावर अत्याचार करून लूट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती याप्रकरणी समोर आली आहे . यात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . या आरोपींनी लुटलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केले आहेत . या धक्कादायक प्रकारामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे . धर्माबाद रेल्वेस्थानकावर हायकोर्ट अर्थात मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे मुक्कामी थांबत असते . रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या बाजूला याच मराठवाडा एक्स्प्रेसचा डबा उभा होता . दोन्ही आरोपींनी रेल्वे स्थानकावरून पीडित महिलेला याच डब्यात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे . या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ठाणे प्रभारी अधिकारी एपीआय सिमा बोईने यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन धर्माबाद गाठले आणि आरोपींना अटक केली . या दोन्ही आरोपींना त्यांनी औरंगाबाद लोहमार्ग न्यायालयासमोर शनिवारी हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . शुक्रवारी दि . २१ दुपारी विधवा महिला आपल्या पतीच्या नावे बँकेत असलेले पैसे काढण्यासाठी उमरी येथून धर्माबादला गेली होती . सायंकाळी उशीर झाल्याने तिला उमरीकडे येण्यासाठी वाहन मिळाले नाही , म्हणून ती धर्माबाद रेल्वे स्थानकावर थांबली . ती एकटीच असल्याची संधी साधून सराईत गुन्हेगार असलेले अक्षय क्षीरसागर ( वय २६ ) राहणार उमरी आणि भीमराव सर्जे ( वय ३५ ) राहणार येळेगाव , ता . धर्माबाद या दोन आरोपींनी तिच्याजवळ जाऊन जबरीने तिच्या जवळील ७५ हजार रुपये किमतींचे सोन्याचे गंठण आदी चोरून घेतले . एवढेच नाही तर तिला रेल्वे स्थानकावर असलेल्या डब्यात नेऊन तिच्यावर या दोघांनी अत्याचार केला . ही घटना २१ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास घडली . त्यानंतर पीडित महिलेने नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला . पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा हलवत धर्माबाद येथील दोन्ही आरोपींना अटक केली . याप्रकरणी गु.र.न. ६६ /२०२२ कलम २९४ , ३२५ , ३७६ ( ड ) भा . द वि . प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धर्माबाद येथील घटनास्थळाला लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी भेट दिली . दोन्ही आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक सीमा बोयने यांनी औरंगाबाद लोहमार्ग न्यायालयासमोर हजर केले . न्यायालयाने या दोघांनाही सात दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे . या प्रकरणाचा तपास स्वतः एपीआय सीमा बोइने ह्या करीत आहेत . दरम्यान या धक्कादायक प्रकारामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे . रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानक परिसरात गुन्हेगारांचा वावर बंद करण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे .