Home विदर्भ मालवाहुची दुचाकीला धडक दुचाकी चालक गंभिर जखमी

मालवाहुची दुचाकीला धडक दुचाकी चालक गंभिर जखमी

371

राष्ट्रीय महामार्गावरील टि.पांईट वरील घटना.

इकबाल शेख

वर्धा / तळेगांव (शा.पं.) :- पेट्रोल पंपावरुन पेट्रोल भरुन महामार्ग ओलांडतांना मद्यधुंद अवस्थेत असलेला दुचाकी चालक नामे ईश्वर सिंग उर्फ बंटी सिंग बावरी हा दुचाकी क्रमांक MH 30 BK 1282 घेऊन अचानक मालवाहुच्या समोर आल्याने मालवाहुची धडक बसुन काहि अंतरापर्यत फेकल्या गेल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.व त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला, सदरची घटना राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी टि. पाईंटवर सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान घडली. ईश्वरसिंग उर्फ बंटीसिंग ददारसिंग बावरी राहणार देवीखदान अकोला वय ३५ वर्ष असे गंभीर जखमी इसमाचे नाव आहे.घटनेची नोंद तळेगाव पोलीसांनी घेतली असुन मालवाहुसह चालक शेख असलम मुर्तिजापुर याला अटक केली आहे.
मालवाहु चालक शेख असलम रा. मुर्तीजापुर अकोला आज सकाळी ११.३० वाजताचे सुमारास मालवाहु क्रमांक. MH- 30- BD- 25 51 हा अमरावती हुन नागपुर कडे स्पेअर पार्ट घेवुन जात असताना. येथील राष्ट्रिय महामार्गावरील आष्टी टि.पाईंटवर पेट्रोलपंपावरुन पेट्रोल भरुन रस्ता अोलांडतांना अतिवेगात असलेला दुचाकी चालक अचानक मालवाहुच्या समोर आल्याने काहि अंतरापर्यंत फेकल्या जावुन गंभीर जखमी झाला. सदर घटनेची माहिती तळेगाव पोलीसांना मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होवुन जखमीस पोलीसांनी पोलीस गाडीने आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात घेवुन गेले परंतु रुग्णालयात पोहचण्या अगोदर त्याची प्राणज्योत मालवली तळेगाव पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मालवाहुसह ट्रकचालकास ताब्यात घेतले पुढिल तपास ठाणेदार आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजू शाहू, संदिप महाकाळकर, रमेश पर्बत, अमोल इंगोले, हे करीत आहे .

आष्टी टी. पाईंट झाला अपघाताचा हाॅटस्पाॅट

येथील आष्टी टि.पाईंटवर गेल्या काहि वर्षापासुन बरेच अपघात झाले असुन यामध्ये अनेक गुरढोरे व मनुष्यांना प्राणास मुकावे लागले तर अनेकांना अपंगत्व सुद्धा आले. तेव्हा येथे गतिरोधक तयार करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.