Home नांदेड दिल्ली येथे होणाऱ्या टी 20 स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात बोधडीच्या अंध विद्यार्थ्यांची निवड

दिल्ली येथे होणाऱ्या टी 20 स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात बोधडीच्या अंध विद्यार्थ्यांची निवड

382

महेंद्र गायकवाड

नांदेड – दिल्ली येथे होत असलेल्या क्रिकेट टी-20 नागेश ट्राफिसाठी नांदेड जिल्ह्यातील बोधडी येथील अंध विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची निवड महाराष्ट्र संघात झाली असून या स्पर्धेत एकूण चोवीस राज्य सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील नावलौकिक असलेल्या बोधडी येथील अंध विद्यालयाने राष्टीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विध्यार्थी व खेळाडू घडविले असून
अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.
अंध विद्यालयात शालेय स्तरावर शिकणाऱ्या मंगेश डाकोरे व अनिल एटी या दोन विद्यार्थ्यांनी आपली प्रतिमा दाखवून दिल्ली येथे होणाऱ्या चौथ्या नागेश ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघामध्ये स्थान मिळविले आहे. अंध विद्यालय बोधडीची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून या विद्यालया मधून नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू तयार झालेले आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या शालेय स्तरावर शिकणाऱ्या मंगेश डाखोरे यांनी आपली प्रतिमा दाखवून दिलेली आहे .टी-20 नॅशनल टुर्नामेंट साठी एकूण राज्य या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यांच्या निवडी बदल जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी व संस्थेचे अध्यक्ष राजेश जी टारफे ,संस्थेचे सचिव प्रकाश जी टारफे व शाळेचे प्राचार्य कांबळे सर यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.