
मजहर शेख, नांदेड
नांदेड/माहूर,दि : २१ :- माहूर तहसीलचे तहसिलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांची संग्रामपूर जि. बुलढाणा येथे बदली झाल्याने दि. 20 सप्टें. रोजी सायं. 7वा. स्थानिक जगदंबा धर्मशाळेच्या सभागृहात त्यांचा सन्मान करून निरोप देण्यात आला.या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी माहूरच्या नगराध्यक्षा शितल मेघराज जाधव ह्या होत्या तर भाजपाचे युवा नेते अॅड. रमण जायभाये, सुमित राठोड,शहराध्यक्ष सागर महामुने, श्रीरेणूकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, सोनापीर दर्गाहचे मुजावर फकीर महंमद यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना सुमित राठोड म्हणाले की,वरणगांवकर यांनी आपल्या कार्यकाळात कार्यालयीन कामासाठी तहसील कार्यालयात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागून त्यांच्या कामाला अधिक प्राधान्य दिले.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ते आपलेसे वाटू लागले होते.माहूर शहराच्या विकासा संदर्भात वरणगांवकर यांचेकडून आपल्याला कायम मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांनी कायम स्त्री शक्तीचा आदर करून सन्मानाची वागणूक दिल्याची भावना शीतल जाधव यांनी व्यक्त केली.सत्काराला उत्तर देतांना वरणगांवकर यांनी आपल्याला माहूरच्या पवित्र भूमीत कर्तव्य बजावण्याची संधी मिळाल्याने देवी-देवता व साधू संताचा आशीर्वाद तर मिळालाच शिवाय निसर्ग सौंदर्याचाही आनंद लुटता आला.या जोरावर सात वर्षे कशी गेलीत हे कळले सुध्दा नाही असे उद्गार काढले.
नगराध्यक्षा शीतल जाधव, पुरोहीत महासंघाचे तालुकाध्यक्ष अनूदीप कोरटकर, बाळू महाराज समुद्रे,भाजपा परिवार, सोनापीर दर्गाहचे मुजावर फकीर महंमद, पाॅवर मिडीयाचे वतीने वरणगांवकर यांचा सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी विश्वस्त अरविंद देव,आशिष जोशी, दूर्गादास भोपी,भारतीय जनता पक्षाच्या महीला शहराध्यक्षा अर्चना दराडे, आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय पेंदोर, भाजपा पत्रकार प्रकोष्टच्या जिल्हाध्यक्षा पद्मा गि-हे, जेष्ठ पत्रकार वसंत कपाटे, नंदकुमार जोशी,राज ठाकूर, अपिल बेलखोडे, राजू दराडे, राम दातिर,सुरेश गि-हे, जयंत गि-हे, संतोष तामखाने, विजय बेहेरे, वल्लभ महाजन, अमोल सूर्यवंशी, यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय आमले यांनी केले,तर नंदकुमार जोशी यांनी आभार मानले.











































