Home नांदेड करखेलीच्या नाल्यात चालणारा जुगार अड्डा धर्माबाद पोलीसांनी केला उध्दवस्त.

करखेलीच्या नाल्यात चालणारा जुगार अड्डा धर्माबाद पोलीसांनी केला उध्दवस्त.

176
0

मजहर शेख, नांदेड

नांदेड,धर्माबाद, दि : ९:- करखेलीच्या कोरड्या नाल्यात बसून जुगार खेळणाऱ्या लोकांवर धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांच्या कुशल नेतृत्वात धर्माबाद पोलीसांनी धाड टाकली आहे. रोख रक्कम आणि 9 दुचाकी गाड्या असा 2 लाख 18 हजार 450 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार शेषराव भिमराव कदम नेमणुक धर्माबाद पोलीस ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 जून रोजी गुप्त माहितीदाराच्यावतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार करखेली शिवारातील कोरड्या नाल्यामध्ये बसून कांही लोक जुगार खेळत आहेत. याबाबतची माहिती पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड आणि पोलीस निरिक्षक सोहन माच्छरे यांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलीस कर्मचारी हरीश मांजरमकर, गृहरक्षक दलाचे जवान नागेश्र्वर, तेलंग, बोधनापौड, राखे, ठेपे, गुत्ते असे सर्व पोलीस पथक करखेलीच्या कोरड्या नाल्यात पोहचले. तेथे त्यांनी जवंत मारोती खांडरे, चंद्रकांत लक्ष्मण सोनटक्के, राजेश्र्वर बापूराव काळेवार, प्रमोद हरीभाऊ खांडरे, संतोष लक्ष्मण खांडरे सर्व रा.करखेली यांच्यासोबत बालाजी चिमनाजी शेलार यांच्याकडून पळून गेलेल्या माणसांची नावे विचारली असता त्यांनी त्यांचे नावे जुगार अड्डा चालक कैलास नामदेव खांडरे रा.करखेली, भगवान शिवाजी भरकड, शंकर भरकड दोघे रा.गोरठा, संभाजी श्रीखंडे, योगेश यादवराव जंगलेकर, साहेबराव बत्तलवाड, शेट्टीबा पिराजी दंडलवार सर्व रा.करखेली, शिवाजी चव्हाण रा.बोळसा खुर्द, अंकुश वैजनाथ कावळे रा.उमरी, गंगाधर पिराजी, यलप्पा पोशेट्टी वलपे दोघे रा.करखेली आणि मोटारसायकल क्रमांक 1814 आणि एक लुनाचे मालक अशा लोकांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. या सर्वांकडून रोख रक्कम आणि दुचाकी गाड्या मिळून 2 लाख 18 हजार 450 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या कार्यवाही करणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Previous articleमनसेच्या दणक्याने खरेदी विक्री साठीची कोरोना चाचणीची अट अखेर रद्द….
Next articleआमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी कोलामपोडावार महत्व पटविल्याने 110 वर्षे वयाच्या भीमबाई रामा टेकाम यांनी घेतली कोविड – 19 ची लस
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.