

मानव तस्करीचे अनेक प्रकरणे उघडकीस येणार
अमीन शाह
चंद्रपूर , दि. २० :- मानवी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी सुनिता टाक उर्फ सपना शूटर हिला अटक करण्यात अखेर चंद्रपूर पोलिसांना यश आलं आहे. चंद्रपूर पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील नाहन येथून सपना शूटरला अटक केली. अटक केल्यानंतर आता तिला आठ दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. सपनाच्या अटकेने मानवी तस्करीतील अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरात आपल्या अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीचं अपरहरण करण्यात आलं होतं. 2010 साली मंदिराच्या परिसरातून 11 वर्षीय चिमुकलीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण करण्यात आलं होतं. 2010 पासून अपहरण झालेल्या या चिमुकलीची नंतर ठिकठिकाणी विक्री करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. एवढचं नाही तर मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. चिमुकलीची एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात ठिकाणी विक्री करण्यात आली.
प्रसादातून गुंगीचं औषध देऊन चिमुकलीचं अपहरण केल्यानंतर तिला तातडीने हरियाणा राज्यताील पानीपत इथं नेण्यात आलं. तिथं त्या चिमुकलीची पहिल्यांदा विक्री करण्यात आली. शेतातीत एका घरात चिमुकलीला डांबून ठेवण्यात आलं. मुलीची खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या मुलानी चिमुकलीवर सतत अत्याचार केले. सतत शारीरिक अत्याचार होत राहिल्यानं अल्पवयीन मुलगी दोन मुलांची आई झाली. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सतत विक्री होत राहिल्यानं हरियाणातील वेगवेगळ्या शहरात मुलीला ठेवण्यात आलं होतं.
घरमालकाच्या सतर्कतेनं बिंग फुटलं
विक्री करण्यात आलेल्या मुलीवर विविध ठिकाणी अत्याचार झाले. खरेदी करण्यात आलेल्या व्यक्तींनी तिचा हवा तसा वापर केला. सतत तिच्याशी शारीरक संबंध ठेवण्यात आले होते. येवढचं नाही तर तिच्याकडून विविध कामेही करून घेतली जात होती. धर्मवीर नावाच्या व्यक्तीनं मुलीला खरेदी केलं. ही मुलीची सातव्यांदा खरेदी होती. खरेदी केलेल्या धर्मवीरनं मुलीला शहरातील एका खोलीत ठेवलं. तिला ठेवण्यात आलेली खोली भाड्याची होती. मात्र मुलीच्या वर्तनाचा घरमालकाला संशय आला. त्यानंतर घरमालकानं मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर मुलीलं झालेला सर्व प्रकार घरमालकाला सांगितला. मुलीच्या तोंडून सत्य परिस्थिती ऐकून घरमालकाला धक्काच बसला. त्यानंतर घरमालकानंं एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मुलीची सुटका केली.
मोठे मासे गळाला लागणार का?
या प्रकरणाच्या खोलात फतेहाबाद पोलीस गेलेत. तेव्हा त्यांना याप्रकरणी चंद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. फतेहाबाद पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी फतेहाबाद गाठून पीडित मुलीला चंद्रपुरात आणलं. याप्रकरणी पीडित मुलीकडे अधिक चौकशी केली. त्यानंतर मुलीनं दोन महिलांची नावं सांगितली. पोलिसांनी तातडीन याप्रकरणी जान्हवी आणि सपना या दोन महिलांना अटक केली. मुलीच्या तस्करीचं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. यात मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी तातडीनं याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.
मानवी तस्करीचे हे मोठे रॅकेट व त्याचे मूळ शोधून काढण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. गेल्या काही वर्षात अचानक बेपत्ता झालेल्या मुलींच्या नातेवाईकांना गाठून या प्रकरणांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. चंद्रपुरात जिल्ह्यातून, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यात मोठ्या प्रमाणात मुलींची विक्री होत असल्याचं याआधी समोर आलं होतं. मागील सर्व अपहरणाच्या प्रकरणाची कडी जोडण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहेत. याप्रकरणात मुलीनं सर्व हकीकत सांगितली आहे. पोलिसांना आता इतर आरोपींपर्यंत पोहचणं शक्य आहे. त्यामुळे चंद्रपुरातील मानव तस्करीची कडी कुठपर्यंत जाते हेच आता पाहावं लागणार आहे.घडलेल्या या गंभीर प्रकरणा मूळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .