Home मराठवाडा शाब्बास पठ्ठे : सिनेस्टाईल सुसाट वेगाने पळणारा हायवा,महसूल पथकाने पाठलाग करत पकडला

शाब्बास पठ्ठे : सिनेस्टाईल सुसाट वेगाने पळणारा हायवा,महसूल पथकाने पाठलाग करत पकडला

241

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

    — धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक महसूल विभागाच्या गस्ती पथकाला आढळला.पथकातील कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी विचारणा केली असता हायवा चालकाने सिनेस्टाईल हायवा सुसाट वेगाने पळवला.अखेर महसूल पथकाने पाठलाग करून हा हायवा पकडला.

याबाबत अधिक माहिती अशी की,महसूल विभागाचे गस्ती पथक २१ एप्रिल बुधवारी रोजी पहाटे गस्तीवर असतांना वडीगोद्रीजवळ अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा दिसून आला.गोदावरी नदीच्या पात्रातून बुधवारी पहाटे अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारा हा हायवा राष्ट्रीय महामार्गाने औरंगाबादच्या दिशेने जात होता.वडीगोद्री जालना टी पॉईंटवर महसूल पथकाने हायवा थांबवला.कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी विचारणा केली असता चालकाने हायवा पळवला.

औरंगाबाद महामार्गाहुन वडीगोद्री गावातून हा हायवा चालकाने सुसाट वेगाने पळवला.सिनेस्टाईल सुसाट वेगात असलेल्या या हायवामुळे वडीगोद्री येथील गावातील एक बैलगाडी चालक व दोन मोटारसायकल स्वार बालंबाल बचावले.अखेर पथकाने पाठलाग करत वडीगोद्री शिवारात जालना बीड महामार्गावर हा हायवा पकडला.चालकाने हायवा सोडून पलायन केले.

सदर हायवा क्रमांक एम.एच.२०-७८८८ हा पकडुन त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.या कारवाईत अंदाजे ५ ब्रास वाळू व हायवा जप्त करून दंडात्मक कारवाईसाठी शहागड पोलीस चौकी येथे लावण्यात आला आहे.अंदाजे ५ ब्रास वाळू ज्याची अंदाजे किंमत ही ३० हजार रुपये असून हायवाची अंदाजे किंमत ही २० लाख रुपये आहे.या पथकाने कारवाई करत जवळपास २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार विद्याचरण कडवकर व पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वामध्ये या मोहिमेमध्ये तलाठी एस.एच.पोतदार,कृष्णा देशमुख,हेपोकॉ.अजयसिंग राजपूत,हेपोकॉ डी.बी.कंटूले,कोतवाल मनोज उघडे,योगेश कुरेवाड,सोमनाथ सरफळे,योगेश जिगे,रवी पटेकर यांचा समावेश होता.