Home विदर्भ शेतकऱ्याची आटापिटा…

शेतकऱ्याची आटापिटा…

440

 

उभं होतं पिक पण पोतं नाही भरलं,
आटापिटा करून आता कोरोनान घेरलं…

पोरं असतात घरी शिक्षण पण हरलं,
पैका पैका काढून सारं व्यापारानं गिळलं…
आटापिटा करून साहेब आता कोरोनान घेरलं…

सन झाले सूने भाव वाढीत पिळलं, पोरीचं होतं लग्न पण काय नाही उरलं..
आटापिटा करून साहेब आता कोरोनान घेरलं…

जनावरं मुके म्हणून कुटारच भरलं,
दिसत नव्हता पर्याय आता विकयच ठरलं…
आटापिटा करून साहेब आता कोरोनान घेरलं…

कर्ज माफी झाली पण काय नाही कळलं,
खात्यावर फक्त लिहून कर्जच उरलं…
आटापिटा करून साहेब आता कोरोनान घेरलं…

मायबाप सरकारचं स्वप्न मनी धरलं,
दरवर्षी सारखंच हमी भाव दडलं…
आटापिटा करून साहेब आता कोरोनान घेरलं…

शेतकऱ्यांच नाव फक्त सत्तेसाठी कोरलं,
जाति,पाती,पंत सांगून एकतेला फोडलं…
आटापिटा करून साहेब आता कोरोनान घेरलं…

आली जरी लस पुन्हा वारं कोरोनाच फिरलं,
काय सांगू हो पाणी विकासचं जिरलं…
आटापिटा करून साहेब आता कोरोनान घेरलं… आता कोरोनान घेरलं..🙏

….✍_महेश वाय. हनवंते
रा. वडकी, ता. राळेगाव,
जि यवतमाळ (४४५३०८)
मो.नं. ८६००९८५५००
ई-मेल: maheshhanvanteytl@gmail.com

कविता आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया कळवा व नक्की शेअर करा…