Home नांदेड किनवट तालुक्यात आवश्यक सोई सुविधा तत्काळ स्वरुपात उपलब्ध करुन द्या – संदिप...

किनवट तालुक्यात आवश्यक सोई सुविधा तत्काळ स्वरुपात उपलब्ध करुन द्या – संदिप केंद्रे

48
0

मजहर शेख,

नांदेड/किनवट, दि : १५:- कोरोना विषाणुच्या वाढत्याप्रादुर्भावावर मात करण्यासाठी शासनांने किनवटच्या आरोग्य यंत्रणेला योग्य ती रसद पुरवावी अन्यथा भारतीय जनता पक्षातर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा भाजपा चे ता. अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे कोरोना चाचणी घेण्याकरिता आवश्यक असलेल्या किट संपल्या असुन त्या शासनाने तात्काळ उपलब्ध करुन द्यावात त्या सोबतच लसिकरण मोहिम ही जोरात वाढवावी अन्यथा प्रादुर्भाव वाढेल व रुग्ण कोण आणी सामान्य कोण हे कळे पर्यंत विलंब होऊ नये.
यावेळी बोलतांना संदिप केंद्रे यांनी सांगितले कि, कोरोना बाधित रुग्णांच्या उपचाराकरिता आवश्यक असलेल्या पी.पी.ई किट, सॅनिटायक्षर, मास्क, हॅण्ड ग्लोज्व इत्यादि साहित्य शासनाने बोधडी, इस्लापुर, शिवणी, गोकुंदा व किनवट येथिल आरोग्य यंत्रणेला पुरवावे जेणे करुन फ्रांण्ट लाईन वर्कर च्या कामात उत्साह निर्माण होईल. प्रशासनाने बोधडी व इस्लापुर हे कॉन्टोनमेंट झोन जाहीर केले परंतु या झोन करिता आवश्यक उपाययोजना राबिण्यात येत नाही त्यामुळे नागरीकांमध्ये भिती चे वातावरण आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी कसे लढायचे हा ही प्रश्न उपस्थित राहत आहे.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले कि, लसिकरण मोहिम देखिल जोरदार पध्दतीने राबिण्यात आली पाहिजे आजच्या स्थितीत लसिकरण हे मंदावले आहे याचे प्रमुख कारण शासनाकडुन लसिंचा अत्यल्प पुरवठा आहे या सोबतच आरोग्य कर्मचा-यांच्या सुरक्षितते साठी आवश्यक सर्व संसाधनाची पुर्तता शासनाने केली पाहिजे. यासोबतच कोरोना बाधित रुग्णांना सर्व प्रकारच्या औषधी, ऑक्सिजन, रेमीसिडीविर इंजेक्शन व वेंटिलेटर ची देखिल मुबलक प्रमाणात उपलब्धता करुन देणे आवश्यक असुन गोर गरिबांच्या मृत्युचे प्रमाण कमी होईल अन्यथा या संसाधना शिवाय गोर गरीब जनतेचे प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरुन कोरोना काळातील गैरसोई बद्द्दल शासनास जाब विचारायला घाबरणार नाही याची देखिल नोद शासनाने घ्यावी व प्रशासनाला सतर्क ठेवुन किनवट तालुक्यात आवश्यक सोई सुविधा तत्काळ स्वरुपात उपलब्ध करुन द्याव्यात अशा इशारा ही केंद्रे यांनी दिला आहे.