Home विदर्भ पुष्पावंती नगरीत साप्ताहिक”हॅलो पुसद” या वृत्तपत्राचे प्रकाशन सोहळा सपन्न

पुष्पावंती नगरीत साप्ताहिक”हॅलो पुसद” या वृत्तपत्राचे प्रकाशन सोहळा सपन्न

261

यवतमाळ / पुसद –  पुष्पावंती नगरीतील विठावा वार्ड येथे दि,5/4/21 रोजी साप्ताहिक हॅलो पुसद या वृत्तपत्राचे लोकार्पन सोहळा आमचे मित्र आदरणीय संजुभाऊ रेक्कावार यांच्या हस्ते फीत कापुन नुकताच पार पडला असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजुभाऊ रेक्कावार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगर परिषद पुसदचे नगरसेवक विष्णु शिखारे ,व मारोती भस्मे,अमोलभाऊ व्होडगीरे,अँड,शिदें यांची उपस्थीती होती, प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणुन कार्यक्रमाला लाभलेले अब्दुल हमीद शेख,बाबा खान, फैजानभाई, गिरीष डांगे, अरविंद कांबळे,मुब्बशिर भाई,विनोद चव्हाण, ओलाणेभाऊ,अफजल खान,अनिल चव्हाण,व इत्यादी पत्रकार तथा सामाजीक कार्यकर्ते उपस्थीत होते,या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन “हॅलो पुसद”चे संपादक बळवंतभाऊ मनवर यांनी केले तर आभार रमेशभाऊ चव्हाण “हॅलो पुसद” चे मुख्यसंपादक यांनी मानले,आणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.