Home नांदेड किनवट शहरात १०० बेडचे कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा- प्रकाश राठोड

किनवट शहरात १०० बेडचे कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा- प्रकाश राठोड

87
0

मजहर शेख,

नांदेड/किनवट,दि : ३१:-दि ३१ किनवट शहरात आणखी १०० बेडचे कोविड केअर सेंटर तत्काळ सुरु करा अशी मागणी रा.कॉ चे ता. अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे कारण जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सुरु असुन देखिल बाधित रुग़्ण कमी व्हायचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही किनवट शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील डिसिएस सेंटर व नविन तहसिल कार्यालयातील सी.सी.सी येथे बेड उपलब्ध नसल्याने अनेक रुग्नांना बेड करिता भटकंती करावी लागत आहे तर यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता आणखी १०० बेड चे कोविड सेंटर नव्याने सुरु करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी केली आहे.
शहरात प्रशासन सतर्क असुन वेगवेगळ्या ठीकाणी कोरोना चाचण्याकरुन रुग्णांना तपासणे चालु आहे यातुन रुग्णसंख्या देखिल वाढलेली आहे तर क्षमते पेक्षा जास्त रुग्ण झाल्याने जिल्ह्यात बेडची उपलब्धता कमी आहे त्यामुळे किनवट येथे बाधित झालेल्या रुग्णांना बेड मिळवण्याकरिता ताटकळत बसावे लागत आहे तर आदिलाबाद, नांदेड, हैद्राबाद अशा ठीकाणी धाव घ्यावी लागत आहे परंतु यातुन सर्वसामान्य नागरीकांचे हाल होत आहे तर त्यांना आर्थिक झळ देखिल बसत आहे यातुन मागील एका आठवड्यात सुमारे ४ रुग्नांनी आपले प्राण गमावले आहे. अशी बिकट परिस्थिती पाहता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ता. अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी १०० बेड चे तात्काळ कोविड केअर सेंटर उभारण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना देऊन तशी मागणी केली आहे.