Home जळगाव २०व्या राष्ट्रीय पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी जळगाव ची कांचन चौधरी रवाना

२०व्या राष्ट्रीय पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी जळगाव ची कांचन चौधरी रवाना

82
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्हा पॅरा ऑलम्पिक संघटनेतर्फे दिनांक २० ते २२ मार्च २०२१ या कालावधीत बेंगलोर कर्नाटक येथे झी स्विमिंग अकॅडमी येथे होत असलेल्या विसाव्या राष्ट्रीय पॅरा ऑलिंपिक स्वीमिंग स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जळगाव जिल्हा पॅरा ऑलम्पिक संघटनेची खेळाडू तथा एकलव्य पुरस्कार प्राप्त कुमारी कांचन योगेश चौधरी या एकमेव खेळाडू ची निवड झाली असून त्या बंगलोर साठी रवाना झालेल्या आहे.
त्यांना जळगाव जिल्हा पॅरा ऑलिंपिक संघटनेचे सचिव फारुक शेख व खजिनदार प्रभावती चौधरी यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून शुभेच्छा दिल्या.
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कांचन चौधरी ह्या जिल्ह्यातील एकमेव खेळाडू असून महाराष्ट्रातील एकूण ४३ खेळाडूंचा यात सहभाग आहे.