Home मराठवाडा वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय सहायक यांच्या कंत्राटी पद्धतीने तात्काळ नियुक्त्या करा- राजेश...

वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय सहायक यांच्या कंत्राटी पद्धतीने तात्काळ नियुक्त्या करा- राजेश टोपे

155
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे.तेव्हा परत एकदा कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय सहायक यांच्या नियुक्त्या करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले . संसर्ग असो किंवा लसिकरण या बाबतीत स्थानिक पातळीवर अधिक मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली पाहिजे.राज्यात एक वेळ अशी होती जेव्हा दिवसात केवळ दोन हजार रूग्ण येत होते.आता परिस्थिती गंभीर होत चालली आहे.त्या दृष्टीने परत एकदा तात्पुरत्या व कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय कर्मचारी व सहाय्यक यांच्या नियुक्त्या करा तसेच बेड्स संख्या कशा पद्धतीने वाढवता येईल याचेही नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्तांकडे दुरदृष्य प्रणालीद्वारे लसिकरण संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती.या बैठकीत राजेश टोपे यांनी मुद्दा उपस्थित केला.या प्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सह मुख्य सचिव सिताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.