
रावेर (शरीफ शेख)
आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग व लोक समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील
अमळनेर तालुक्यातील तिसर्या टप्प्यातील शेकडो आदिवासी महिलांना लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी श्रीमती सिमा आहिरे मॅडम, नगरसेविका राधाबाई पवार, दहिवद गावाच्या मा सरपंच नंदाबाई मावळे, यांच्या हस्ते आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शेकडो आदिवासी महिलांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत निकाल दिलेला आहे त्यानुसार लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील विविध गावातील तिसर्या टप्प्यातील रेशनकार्ड तयार करण्यात आले व आज उपविभागीय अधिकारी कार्यालय अमळनेर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उपविभागीय अधिकारी श्रीमती सिमा आहिरे मॅडम नगरसेविका राधाबाई पवार, दहिवद गावाच्या मा सरपंच नंदाबाई मावळे तहसिलदार मिलिंदकुमार वाघ साहेब,नायब तहसिलदार संतोष बावने साहेब यांच्या हस्ते संगिताबाई पारधी, आशाबाई पारधी, छायाबाई चव्हाण, आणुबाई पारधी, नागिनबाई पारधी, रत्नाबाई भिल, गौतमाबाई भिल सह शेकडो आदिवासी महिलांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले व मागील काही वर्षांपासून नगरसेवक असलेले मा नगरसेवक साहेबराव पारधी यांना हि आज रोजी तहसिलदार मिलिंदकुमार वाघ साहेब यांच्या हस्ते रेशन कार्ड देण्यात आले यावेळी लोक संघर्ष मोर्चा चे विभागीय संघटक पन्नालाल मावळे सह बालीक पवार, मधुकर चव्हाण, जय पारधी, भिमराव पवार, गणेश चव्हाण, शांताराम चव्हाण, प्रदीप दाभाडे, रविंद्र पारधी, राकेश पारधी, शुभम पारधी, भिका पारधी, सोनु दाभाडे, प्रविण पवार, दिनेश पारधी हजर होते आभार पन्नालाल मावळे यांनी मानले.











































