Home विदर्भ कमांडिंग ऑफिसर कर्नल डी.व्ही. भास्कर यांची गांधी विद्यालयाला भेट

कमांडिंग ऑफिसर कर्नल डी.व्ही. भास्कर यांची गांधी विद्यालयाला भेट

130

 ईकबाल शेख

वर्धा – वर्धा जिल्हा आर्वी तालुका स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालय मध्ये आज दिनांक १ फेब्रुवारी २०२१ रोजी एनसीसी छात्र सैनिकांची ‘अ ‘प्रमाणपत्र परीक्षा आयोजित करण्यात आली होती यामध्ये आष्टी येथिल हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय तसेच लोकमान्य विद्यालय मधील सुद्धा ५० सैनिकांचा सहभाग होता. तसेच गांधी विद्यालयाच्या ४९ छात्रसैनिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी व्ही भास्कर तसेच नायब सुभेदार भारत सिंग हवलदार पुरण सिंग, हवलदार दिनेश सिंग तोमर हे वर्धा येथून परीक्षा घेण्याकरता उपस्थित होते यावेळी एनसीसी पायलट तसेच अधिकारी प्रमोद नागरे, संजय सिसट आणि चंदिवाले यांनी कर्नल डी.व्ही. भास्कर यांना मानवंदना दिली तसेच चार एन.सी.सी पथकाने शिरोमनीयल परेड करून यांना मानवंदना दिली .यावेळी नगर परिषद ,आर्वी च्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्रीमती प्रतिभाताई गिरी उपस्थित होत्या .तसेच प्राचार्य यु.व्ही नागपुरे ,ज्येष्ठ शिक्षिका किरण अग्रवाल या उपस्थित होत्या. कमांडिंग ऑफिसर यांनी मागील वर्षी मध्ये एन.सी.सी मधून प्रथम आलेली मुलगी कुमारी गायत्री राऊत हिला स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान केले. आपल्या भाषणांमधून कर्नल डी. व्ही. भास्कर यांनी.गांधी विद्यालयातील सर्व एन.सी.सी छात्रसैनिकांचे कोरोना काळात ही फीट इंडिया सारखे उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक केले. एनसीसी छात्र सैनिकांना भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या संधी सैन्यदलामध्ये उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती दिली तसेच एनसीसी कॅडेट हा नेहमी सेवेसाठी तत्पर असायला पाहिजे त्याच्यामध्ये शिस्त असली पाहिजे त्याने एक चांगला नागरिक बनण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. त्यांना बी आणि सी.प्रमाण पत्र पूर्ण केल्यानंतर सुद्धा कुठल्या संधी आहेत ग्रॅज्युएशन केल्यानंतर सुद्धा कुठल्या संधी आहेत आणि आय एम ए देहरादून तसेच एन डी ए पूणे याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आणि अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली यामध्ये सर्व तीनही शाळांच्या विद्यार्थ्यांनी डीएसटी ड्रिल यामध्ये ट्रेनिंग मॅप रिडिंग, जनरल नॉलेज, मार्चिंग ,टर्न् आऊट विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हे पाहण्यात आले आणि त्यावरून त्यांना गुणांकन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एन सी सी अधिकारी प्रमोद नागरे तर आभार प्रदर्शन संजय किटे यांनी केले.