Home मराठवाडा ट्रेलरच्या खाली चिरडुन दावलवाडी चे दोघे ठार ,

ट्रेलरच्या खाली चिरडुन दावलवाडी चे दोघे ठार ,

128

 

दुखद घटना

नजाकत सय्यद ,

बदनापूर/प्रतिनिधी
सेलगाव हुन दावलवाडी कडे जाणाऱ्या मोटारसायकल ला जालना हुन बदनापूरकडे येत असलेल्या ट्रेलर ची जोराची धडक बसल्याने मोटारसायकलस्वार दोन्ही तरुण ट्रेलरखाली चिरडून जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना २९ जानेवारी रोजी दुपारी दावलवाडी फाट्याजवळ घडली असून मृत तरुण दावलवाडीचे राहवाशी आहे ,वैभव दत्ता चव्हाण वय १८,आकाश सारंगधर जाधव वय २१ असे मृतकाचे नाव आहे
बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथील वैभव दत्ता चव्हाण व आकाश सारंगधर जाधव हे दोघे जण काही कामानिमित्त मोटर सायकल क्रमांक एम एच २१ बी सि ०५६० वर शेलगाव येथे आले होते ,सेलगाव येथील काम संपल्यानंतर ते गावी म्हणजे दावलवाडी येथे जाण्यासाठी ४ वाजेच्या सुमारास निघाले व दावलवाडी  फाट्या  वर मोटारसायकल वळविली  असता जालना कडून बदनापूरकडे भरघाव वेगात  निघालेल्या ट्रेलर( क्रमांक एम एच २१-बी एच ३३१६) ने मोटारसायकल ला जोराची धडक दिल्याने दोन्ही मोटारसायकलस्वार खाली पडले व टायरच्या खाली चिरडून जागीच गतप्राण झाले ,घटनास्थळी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी भेट दिली असून पुढील कारवाई सुरु आहे