Home विदर्भ जिल्हाधिकारी कार्यालयात 21 डिसेंबरला महिला लोकशाही दिनाचे आयोजन.!

जिल्हाधिकारी कार्यालयात 21 डिसेंबरला महिला लोकशाही दिनाचे आयोजन.!

88

योगेश कांबळे

वर्धा,दि. 18 – समस्याग्रस्त व पिडित महिलांच्या प्रश्नांची शासनाकिय यंत्रनेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिला सुलभ मार्गदर्शनाची सुविधा व्हावी यासाठी राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिन्याच्या तीस-या सोमवारला जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात येते. 21 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणा-या महिला लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडित महिलांनी व्दिप्रतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, महिलांनी स्वत: उपस्थित असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात नसणारे अर्ज, न्याय प्रविष्ठ, सेवा व आस्थापना विषयक प्रकरणे, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसल्यास स्वरुपाचे नसल्यास स्विकारण्यात येणार नाही. असे महिला व बाल विकास विभागाने कळविले आहे.