Home मराठवाडा जालन्यात खा.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

जालन्यात खा.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

572

जालना -‌ लक्ष्मण बिलोरे

कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री तथा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या जालनास्थित निवासस्थानी जाऊन आज राखरांगोळी आंदोलन केले.या बाबतचे
निवेदन …. यांनी स्विकारले शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारने नुकतेच शेतीमाल, व्यापार सुधारणा विधेयक मंजूर केले आहे.या विधेयकात कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले आहे.नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकण्याची मुभा मिळालेली आहे.
युध्दजन्य आणिबाणीची परिस्थिती असल्याखेरीज सरकारने शेतीमालाच्या भावात हस्तक्षेप करू नये असा कायदा असताना केंद्र सरकारने अचानक १४ सप्टेंबर रोजी कांद्यावर निर्यातबंदी आणून कायदेभंग केला आहे.महाराष्ट्रात कांदा हे महत्त्वाचे पिक आहे . काही दिवसांपूर्वी कांदा मातीमोल भावाने विक्री झाला , शेतकऱ्यांना कांदा फेकून द्यावा लागला तेव्हा सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयामाया आली नाही.कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला.काद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी रडू लागला तेव्हा केंद्रसरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे पुसले नाही.कसलीही मदत केली नाही.आता कुठे कांदा विक्रीतून दोन पैसे मिळू लागले तर निर्यातबंदी लादली . कांदा विक्रीवर निर्यातबंदी लादणे म्हणजे हि शेतकऱ्यांच्या प्रपंचाची राखरांगोळी आहे सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू असून लोकसभेच्या चालू अधिवेशनात कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी आवाज उठवावा आणि देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी प्रभावीपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने भुमिका घ्यावी कशी मागणी केली. या निवेदनावर शेतकरी संघटना महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा गिता खांडेभराड, संघटनेचे प्रदेशउपाध्यक्ष आप्पासाहेब कदम, बाबुराव गोल्डे, लक्ष्मण कांबळे,गजानन भांडवले,विश्वांभर भानुसे, रेणूका चोकणफळे, रामप्रसाद खरात, राजेंद्र अटकळ, योगेश पवार, योगेश दिवटे आदींची नावे आहेत.