Home मराठवाडा अहोराञ किराणा दुकाणात काम करणार्या कामगाराचा सत्कार

अहोराञ किराणा दुकाणात काम करणार्या कामगाराचा सत्कार

70
0

जालना : – कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात टाकून लोकांसाठी अखंडपणे एकही सुट्टी न घेता किराणा दुकान मध्ये काम करणाऱ्या सर्व मुलांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. सर्व मुलांना मालकांनी फक्त शाल-श्रीफळ, फेटा प्रमाणपत्र देऊनच सत्कार केला नाही तर त्याच बरोबर त्यांना संसार उपयोगी वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.


अंबड येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वाती ट्रेडिंगचे मालक निलेश शेठ लोहिया त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलांना नेहमीच ते सन्मानपूर्वक वागणूक देत असतात मागील काळामध्ये त्यांनी कामावरील सर्व मुलांना विमानाद्वारे हैदराबादला पाठवले होते त्याचबरोबर रामोजी फिल्म सिटी व शिर्डी ला वॉटर पार्क मध्ये 2 वेळेस इतर ठिकाणी त्यांना फिरण्यासाठी सर्व खर्च हा स्वतः निलेश लोहिया यांनी केला होता त्याचबरोबर आपल्याकडे काम करणाऱ्या सर्व मुलांना रोज जेवण सुद्धा ते आपल्या दुकानात देतात आपण इतरत्र पाहिले तर काम करणाऱ्या मुलांना साधा चहा सुद्धा दुकान मालक देत नाही. मात्र निलेश लोहिया अशी व्यक्ती आहेत की आपल्या दुकानात काम करणारा व्यक्ती आनंदी असला तरच आपण दुकान चालू शकतो त्याच्या भरोशावर आज आपले दुकान चालते हे त्यांनी ओळखले असल्यामुळे ते नेहमीच दुकानातील मुलांना सन्मानपूर्वक वागणूक देतात.

मुलांचा व त्याच्या परिवाराचा विमा – 

आपल्या दुकानातील सर्व मुलांचा व त्यांच्या परिवारांचा विमा त्यांनी काढलेला आहे त्याचबरोबर त्यांच्या पूर्ण परिवाराची हेल्थ पॉलिसी सुद्धा काढलेली आहे.दुकानात काम करणाऱ्या मुलांच्या परिवारातील कोणताही व्यक्ती आजारी पडला तर मुलांना खर्च करण्याची गरज पडू नये म्हणून हेल्थ पॉलिसी काढली आहे.
त्याचबरोबर दुकानातील काम करणाऱ्या मुलांच्या पाल्यांचा सर्व शैक्षणिक खर्च निलेश लोहिया स्वतः करत आहेत. आपल्याकडे कामाला असलेल्या सर्व मुलांना एक टाईम चांगले जेवण ते दुकानातच देतात त्यामुळे मुलांना घरून डब्बा आणण्याची गरज पडत नाही. आज त्यांच्या निवासस्थानी सर्व मुलांचा सन्मान करून त्यांना कोरोना योद्धा हे प्रमाणपत्र दिले त्याच अनेक संसार उपयोगी वस्तू दिल्या .

लॉक डाऊन मध्ये भरघोस मदत

कोरोना काळामध्ये अखंडपणे सामाजिक काम करणारे लोहिया यांनी 1000 पेक्षा जास्त किट अंबड शहरात व परिसरात मोफत वाटल्या होत्या , त्याचबरोबर परप्रांतातून येणाऱ्या वाटसरूंना पायी जाणाऱ्या लोकांना दररोज जेवणाचा व्यवस्था त्यांनी केली होती.

मुलांना आराम मिळावा म्हणून म्हणून दुकान रविवारी बंद….!

निलेश लोहिया यांचे अंबड शहरात होलसेल किराणाचे दुकान आहे त्यामुळे दुकानात नेहमीच गर्दी असते.आठवडाभर मुलांना काम केल्या मुळे त्यांना 1 दिवस आराम मिळावा म्हणून दुकान रविवारी बंद ठेवत आहेत.

आगळा वेगळा उपक्रम…!

आपल्याकडे काम करणाऱ्या कामगाराला साधा एक वेळचा चहा न पाजणारे अनेक दुकानदार अंबड शहरात आहेत तर दुसरीकडे कामगारांना ही सन्मान पुरवणं वागणूक देऊन ते व एक माणूस आहेत त्यांनाही त्यांचा मानसन्मान दिला पाहिजे नुसता मानसन्मान नाही तर त्यांचा व त्यांच्या परिवाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेणारा मालक अंबड शहरात आहे त्याचा अंबड शहराला सार्थ अभिमान आहे.