जळगाव

सोशियल मीडिया वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो एडिटिंग करून सामाजिक भावना दुखावल्या बद्दल छत्रपती क्रांती सेना ने केली पोलिसात तक्रार

Advertisements
Advertisements

रजनीकांत पाटील

अमळनेर शहरप्रतिनिधी – छत्रपती क्रांती सेना मार्फत भिलवाडा येथिल ताराचंद खेतावत याने फेसबुक वर महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो एडिटिंग करून आमची सामाजिक भावना दुखावणे , दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे या माध्यमातून शांतता बिघडवून राज्यातील कायदा व सुव्यवस्था भंग करणे या षडयंत्रा विरुद्ध तक्रार अमळनेर पोलिस निरीक्षक अंबादास मोरे याना देण्यात आले.

सदर अर्जात मागणी केली आहे की, भिलवाडा येथिल ताराचंद खेतावत याने आपल्या फेसबुक वरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोशाख केलेला नरेंद्र मोदी यांचा फोटो अपलोड केला आहे. या मुळे आमच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या फोटो मध्ये आमचे आदर्श कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक लोकराजा छत्रपती शिवाजी
महाराज यांचे चरित्र सार्वजनिक रित्या कलुषित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते हे अनेक पुराव्यावरून स्पष्ट होते.नरेंद्र मोदी व छत्रपती शिवाजी महाराजांची अनाठायी तुलना करणारा फोटो सोशल मीडियावर टाकल्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ गढूळ होण्याची शक्यता आहे.अशा प्रकारच्या फोटो फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल करून समाज स्वास्थ्य
बिघडवण्याचा भिलवाडा येथिल ताराचंद खेतावत याचा डाव आहे. त्यामुळे त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. मा.पोलीस निरीक्षक यांना विनंती करतो की गैरअर्जदारावर भा.दं.वि.कलम 295अ, 298, 195, 120ब, 124अ, 153 ब, 147, 148, 149, व 34 अन्वये गुन्हा नोंद करून त्यास तत्काळ अटक करावी , करिता तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याप्रसंगी छत्रपती क्रांती सेनाचे तालुका अध्यक्ष दयाराम पाटील सह राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष नाविदभाई शेख, गुलामनबी व राष्ट्रीय किसान मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत जगदाळे उपस्थित होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

नरेंद्र मोदी जीं च्या वाढदिवसानिमित्त मनियार बिरादरी तर्फे १८ मागण्याचे निवेदन

रावेर (शरीफ शेख)   माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मन्यार ...
जळगाव

अल्पसंख्यांक सेवा संघटने च्या जिल्हाध्यक्ष पदी सलीम इनामदार यांची निवड

रावेर (शरीफ शेख)  अल्पसंख्यांक सेवा संघटने ची प्रदेश कार्यालय शिवाजीनगर येथे प्रदेशाधयक्ष जहाँगीर ए खान ...
जळगाव

सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांचा “कोरोना वॉरीयर्स” सन्मानपत्र देऊन गौरव

रावेर (शरीफ शेख)  जळगाव तालुक्यातील वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते,गौरी गृपचे चेअरमन सुमित जानकीराम पाटील यांचा ...