Home जळगाव डीआरएमने केळी व्यापा-यांशी केली ऑनलाइन चर्चा

डीआरएमने केळी व्यापा-यांशी केली ऑनलाइन चर्चा

62
0

प्रतिनिधी – लियाकत शाह

भुसावळ – भुसावळ-येथील मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी आज दि.१२ सप्टें बर शनिवार रोजी विभागातील प्रमुख केळी व्यापा-यांसोबत ऑनलाईन विडिओ कॉन्फेरंस द्वारे चर्चा केली. भविष्यात केळीची लोडिंग वाढविण्या संदर्भात रावेर, निंभोरा, सावदा येथील व्यापा-यां सोबत चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी मंडळ वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार यांनी सर्व व्यापा-यांचे स्वागत करून परिचय करुन दिला व बैठकीला सुरुवात करण्यात आली. व्यापा-यांच्याद समस्या जाणुन घेण्यात आल्या मंडळ रेल्वेक प्रबंधक श्री.गुप्तात यानी आश्वासन दिले कि, सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल व सर्वतोपरी सहकार्य हे रेल्वे कडून करण्यात येईल. व्यापारी संघाने सुध्दार रेल्वेला आश्वासन दिले कि, आगामी काळात केळीची लोडींग सुरु करण्याबाबत विचार करून लवकरात लवकर सुरू केली जाईल. सदर बैठकीत वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर.के.शर्मा यांनी केळी ही बीसीएन वॅगन किंवा पार्सल यान विपी द्वारे सुद्धा पाठवू शकतील हे सांगण्यात आले. केळी व्यापारी संघाकडून डी.के. महाजन, हरीश गनवाणी, नरेश सेठ, रामदास त्र्यंळबक, कडु धोंडू ,पिंटू सेठ,भागवत पाटील हे उपस्थित होते. वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज आर पाटील यांनी सर्व व्यापा-यांचे आभार व्यसक्तत करून बैठकीचा समारोप झाला.Ñ