Home महत्वाची बातमी पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा...

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

1020

राम खुर्दळ

पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा फुकट राबणारा स्थर लाखोंच्या संख्येने आहेत , सध्या कोरोनाच्या स्थितीत समाजात दानधर्म व जीवनावश्यक गरजा समाज गोरगरिबांना देतंय , मात्र आयुष्यभर पत्रकारितेत कार्यरत सामान्य पत्रकारांना माध्यमे,समाज,नेत्या अधिकाऱ्यांनी,पत्रकार संघटनांनी किती समजून घेतले,मदत तर नाहीच मात्र त्यांना साधे आपुलकीने त्यांच्या अडचणी तरी विचारल्या का?याबद्दल सगळे गप्पगार आहेत,कोण्ही बोलणार नाही मात्र स्वतः उपाशी अडचणीत राहून सामाजिक उपासमारीच्या,बेरोजगारीच्या बातम्या देणारे , नेत्या पुढाऱ्यांच्या दानाच्या बातम्या बनवणारे मात्र स्वतःच्या घरच्या अडचणीत किती फसलेत याबद्दल एक शब्द चकार ही मंडळी काढीत नाही , माझ्या एक जुन्या पत्रकार मित्राची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे तर दुसऱ्या एक मित्राची आई ऍडमिट आहे,करणार काय तुमची आमची जवळपास स्थिती कारण कुठला वेतन आयोग सोडा साधे वेतन कष्टाचे मानधन मिळत नाही तर बोलणार काय? सगळीकडे अंधार व उपेक्षा सोडून काहीही नाही बाबा….
सामाजिक संवेदना व सामाजिक मुद्द्यावर तुम्ही जागृत असला व अश्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ होतात , याच अस्वस्थतेला वाट करून देण्यासाठी लाखो व्यक्ती पत्रकारितेत येतात,सातत्याने केवळ वापरण्यासाठी आपल्या।माध्यमात राबण्यासाठी , नको त्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी बैल हवा तसे ग्रामीण/शहरी पत्रकार राबत असतात,केवळ सामाजिक मुद्द्यांवर भान असत म्हणून हा घटक बातमीसाठी कित्येक वैर अंगावर घेत असतो,केवळ जीवाचे हाल करून अवमान अपमान पचवून स्वतःचे घरदाराच तुटपुंजे पैसे पत्नी मुलांसाठी नव्हे बातमीसाठी खर्चून महिना से-दोनशे रुपये कमावणारे लाखो पत्रकार साहेबां प्रमाणे आपल्याला दिसतील ( त्यात काही धूर्त,स्वतःच्या हेतूसाठी नोकरी,व्यवसाय करणारे यात घुसलेत ) मात्र बहुतांशी सामान्य पत्रकार या क्षेत्रात आयुष्यभर राबून कित्येक त्रास पळून देशोधडीला लागला आहे. पत्रकारविषयी समाजाला नेत्या,अधिकाऱ्यांना फार गैरसमज असतात,सगळ्यांकडे बघतांना या।मंडळींचा गॉगल सारखाच असतो,मात्र नेहमी धडपडणाऱ्या इमानी पत्रकारांना पावसाळ्यात धड घराचे पत्रे , कौल बसवता येत नाही,की घरात आजारात,मुलांना शाळा फी बाबत मरणयातना भोगावया लागतात,या वर्गाला सतत माध्यमे वापरतात, मरणाची वेळ आल्यावर सोडून देतात,या क्षेत्रात काही वतनदार सोडले तर ८० टक्केहून अधिक पत्रकार आपली आख्खी जिंदगी बातमीसाठी खर्ची लावतात,प्रसंगी मारहाण झाली,वैर ठेवणार्याने अपघातात उडवले,घरातील व्यक्ती आजारी पडली,स्वतः आजारी पडला, आई आजारी पडली तर कोण्ही एक दमडीला उभे करीत नाही.
सध्या कोरोनाच्या स्थितीत कित्येक पत्रकारांचे कामे गेली कोण्ही समाजातून साधा एक शब्द ही त्या पत्रकारांच्या अडचणी विचारत नाही,केवळ बातमीसाठी मात्र फोन करतात,माझे बरेच परिचयातील पत्रकार मित्र व मी ही सुद्धा अनेक अडचणीशी तोंड देतोय आयुष्याचे ३ तपे व त्याहून आधिक फुक्कट विना मोबदला बातमीसाठी राबतोय मात्र अजूनही एक संघटना एक व्यक्ती भेटला नाही की घरची तुझी परिस्थिती कशी आहे मात्र बातमीसाठी चिखल तुडवीत,पुरात पावसात उपाशीपोटी बातम्या मात्र आम्ही ग्रामीण भागातून/वस्तीतून देत आलोय,राबा व मरा अशी गत आहे.
अजून खूप मुद्दे मरणाचे आहेत मात्र बधिर संघटना,बधिर बांधव गप्पगार वाचतात,यावर मनमोकळे व्यक्त होत नाही।मात्र सुटबुटात पत्रकार दिनाला पुरस्कार घेतात,हेच उरल्याची स्थिती सर्वत्र आहे.

आपला‌ – 
श्री.राम खुर्दळ (पत्रकार)
राज्यउपाध्यक्ष – पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र राज्य – 9423055801