Home जळगाव जळगांव पोलिस दलातील रावेर वाहतूक पोलिसाचा अमाणूसकिय निर्दयीपणा

जळगांव पोलिस दलातील रावेर वाहतूक पोलिसाचा अमाणूसकिय निर्दयीपणा

600
0

रुग्ण पित्यास जेवण देण्यास जाणार्या मुलाची मोटारसायकल केली जप्त व दोन तास बसविले ताटकळत पोलिसांतील देवमाणूस झाला निर्दयी

 

दंडाची पावती न देता पैशाची वसुली

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील एक रुग्ण मध्यप्रदेशातील बुरहानपुर येथील ऑल इज वेल या मल्टीप्लेक्स हॉस्पिटल मध्ये ६दिवसापासून उपचारांसाठी दाखल असून त्यांचेवर तेथे उपचार सुरू आहेत सर्व कुटुंबीय ताणतणावाच्या परिस्थिती त आहेत मात्र रुग्णालयात रुग्णांची देखभालीसाठी घरातील सदस्य दवाखान्यात हजर आहेत त्यांचे जेवण दैनंदिन मोठा वाघोदा येथून नित्यिप्रमाणे रुग्णांचा मुलगा हा पोहोच करण्यासाठी बुर्हानपुर येथे जात असताना रावेर पोलिस स्टेशन ला कार्यरत धांडे नामक पोलिस कर्मचारी यांनी शे.मुस्तकिम शे चांच यांची मोटारसायकल अडवली (मात्र मास्क‌ असतांना )तोंडाला मास्क नाही .गाडीचे लाईसन कागदपत्रे दाखव म्हनत गाडीची किल्ली काढून सहकारी सोबती कर्मचारी चे हातात देत ५००/-रपये दंड मागितले मात्र या आजारी रुग्णांच्या मुलाजवळ एक दमडीही नसल्याने रुग्णाचा मुलगा शे.मुस्तकिम याने रडतरडत हात जोडून सर्व कैफियत सांगूनही माणूसकी हरवलेल्या या धांडे नामक वाहतूक पोलिसाला दयेचा जराही पाझर फुटला नाही उलट वाहतूक पोलिसांना वाहन जप्त करण्याचे काही एक नियम नसतांना मोटारसायकल तर जप्त केलीच पण या रुग्णाचा जेवणाचा डबा पोहचविणार्या मुलासही मोटारसायकल सह ताब्यात घेऊन रावेर पोलिस स्थानकात नेले व २ तास बसवून ठेवले आणि मोटारसायकल ची किल्ली खिशात घेऊन निघतांना पैसे आण आणि तू आणी तुझी गाडी घेऊन जा असे म्हणत निघून गेले ही सर्व हकिकत शे.मुस्तकिम यांनी ठोस प्रहारचे मोठा वाघोदा प्रतिनिधी मुबारक तडवी यांना सांगितली असतांना या वाहतूक कर्मचारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यांनी बोलण्याचे टाळले एकीकडे जळगांव जिल्हा पोलिस दल कोरोना महामारी संकट काळात अनेकानेक प्रकारचे सहकार्य नागरिकांना सलग ५,६ महिन्यांपासून जनसेवेच्या रुपातून अविरतआजतागायत पुरवित आहेत यात अन्न वस्त्र निवारा सह,प्रवास, पादत्राणे ही पुरवठा करण्यात मागे सरकलेले नाहीत यात सर्व जळगांव जिल्ह्यातील पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांत सर्वच दुःखी पिडीतांना खाकी वर्दीतला दर्दी देवमाणूस अनुभवला व अनुभवयास मिळत आहे मात्र आज दि.९/९/२०२० रोजी दुपारी ४ते ६ या दोन तासात रावेर पोलिस स्टेशन ला कार्यरत वाहतूक पोलिसाचा उपरोक्त कालावधीतील नियुक्त वाहतूक पोलिसातील अमाणूसकीचे दर्शन घडले व दिवसरात्र आपले व आपल्या परिवारासह सर्वांचे जिव धोक्यात टाकत अथक परिश्रम घेत जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा करणार्या पोलिस बांधवांची प्रतिमा व निस्वार्थ जनसेवेसह पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन करीत असणार्या या कठोर ह्रदयी ,निर्दयी वाहतूक पोलिसाच्या कर्तबगारीतून निर्दयीपणाचे दर्शन घडले या उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णाच्या मुलाजवळ फुटकी दमळी नसतांना पोटात अन्नाचा कण नसतांना जिव कासाविस करीत असतांना रडून हात जोडून विनवणी करुनही या दगडह्दयी निर्दयी वाहतूक पोलिसाला काही एक दया आली नाही अखेर शे.मुस्तकिम ने मोठा वाघोदा येथील मलिक जावेद या आपल्या आजोबा यांना रावेर पोलिस स्थानकात बोलावून दंडाची रक्कम या वाहतूक पोलीस कर्मचारी यांना दिली मात्र या प्रामाणिक व नियमबद्ध महाशय वाहतूक पोलिसाने पैसे घेतले मात्र दंडाची पावती न देता दुसर्याच्या पावतीत ऐडजेस्ट केले सांगत शे.मुस्तकिम व मोटारसायकल सोडली आता या काराभाराला काय म्हणावे ?नियम तोडले मान्य आहे परंतू दंड भरुन पावती न देणे हे अमान्य असून नियमबाह्य वर्तन आहे त्याबरोबरच एखाद्याला दुखात सहकार्याऐवजी उलट त्रास देणे हे अमाणूसकीचे उघड उघड दर्शन घडले आहे तरी अशा पोलिस प्रशासनाने केलेल्ल्या निस्वार्थ जनसेवेवर बदनामीचे पाणी फेरणार्या या रावेर पोलिस स्थानकात कार्यरत वाहतूक पोलिसाला माणूसकीच्या दर्शनाचे धडे गिरविण्याचे प्रशिक्षण वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी द्यावे अशी मागणी वजा विनंती या त्रस्त आजारी रग्णाचे मुलासह सुज्ञ नागरिकांतून होत आहे.