Home जळगाव अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत ६७ सार्वजनिक गणपतींची स्थापना ३१ गावांमध्ये ‘एक गाव...

अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत ६७ सार्वजनिक गणपतींची स्थापना ३१ गावांमध्ये ‘एक गाव – एक गणपती’ उपक्रम

151

रजनीकांत पाटिल

अमळनेर – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करीत सर्वत्र दरवर्षाप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत ३१ गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावर्षी कोरोना आजाराने सर्व जनजीवन विस्कळीत केले आहे. त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन शासनाने केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबत शासनाने काही मार्गदर्शक सूचना व निर्देश जारी केले आहेत. शासनाच्या आवाहनास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे. सन २०२० यावर्षी अमळनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत६२ सार्वजनिक तर ५ खाजगी गणेशोत्सव मंडळाची नोंदणी करण्यात आली आहे.
एक गाव – एक गणपती
या गणेशोत्सवात ग्रामीण भागातील ३१ गावांमधील नागरिकांनी ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमात सहभाग घेतला आहे. यात खेडी खु.॥ व सीम, दापोरी खु.॥ व मुंगसे,
सावखेडा,कोंढावळ,रढावण, गंगापूरी, मठगव्हाण, बिलखेडा, रामेश्वर, देवगाव देवळी, कन्हेरे, ढेकूसीम, खवशी, बिलखेडा, धावडे, रामेश्वर खु.॥, खोकरपाट, मांजर्डी, कु-हे सीम, दापोरी बु.॥, रणाईचे, एकरूखी, पातोंडा, टाकरखेडे, निमझरी, ढेकू अंबासन, कावपिंप्री, इंद्रापिंप्री, धुपी,सुंदरपट्टी या गावांचा समावेश आहे.
चोख बंदोबस्त तैनात
गणेशोत्सव शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशनचे ५ अधिकारी,
४५ कर्मचारी,३० होमगार्ड,
१ आरसीपी,१ स्ट्रकिंग फोर्स व
११ कर्मचारी बाहेरून आलेले असे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. या गणेशोत्सवात स्थापना व विसर्जन मिरवणूकीस परवानगी असणार नाही. गणेश मंडळांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे. भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून मंडळाच्या ठिकाणी अधिक गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.