
योगेश कांबळे
वर्धा – देवळी तालुक्यात दिवसेन दिवस कोरोना रुंग्णात वाढ होत असून ही चिंतनीय बाब असून तालुक्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य काळजी घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण धमाणे यांनी केले आहे.
देवळी तालुक्यात एकुण 64रुग्ण पॉझिटीव्ह मिळाले असून
46 रुग्ण पुलगावातिल कोरोणा असून 18 रुग्ण इतर गावातिल आहेत. एकूण 64 रुग्ण बाधित आहेत.
संस्थात्मक विलगीकरनात 47 तर गृहविलगीकरनात 118 आहेत. आज घोडेगाव कोळोना,गुंजखेडा,पुलगाव येथील हिगणघाट फैल व देवळी येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये पोझिटीव्ह रुग्ण मिळाले आहेत.त्यांना सावंगी रुग्णालय येथे कोरोणा सेंटर मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. देवळी येथील 93 नागरीकाचे स्नॅब रँपिट अँन्टी टेस्ट केली असता निगेटिव्ह आलेत .अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅक्टर प्रविण धमाणे यांनी दिली आहे.
तालुक्यातिल नागरीकानी गर्दीचे ठिकाण टाळावेत व महत्वाचे कामा व्यतीरिक्त बाहेर पडु नये.वेळोवेळी आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनाचे पालण करुन नागरिकांनी आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहण तालुका आरोग्य अधिकारी डाॅक्टर धमाणे यांनी केले आहे.










































