Home महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संशोधन लेखन पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संशोधन लेखन पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

171

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इतिहास संशोधन , संस्कृती,कला,वारसा जतन व पुस्तक वस्तू संग्रहालय अंबड या संस्थेच्या वतीने महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त थोर लेखक साहित्यीक,चित्रकार,वारसा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्यांचा दि २८ आँक्टो २०२० रोजी वेगवेगळे

राज्यस्तरीय पुरस्कार देवुन गौरव करणार आहोत याकरिता साहित्यिक – लेखकांनी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रतीसह बायोडेटा तसेच पासपोर्ट छायाचित्र संपूर्ण पत्ता,पिनकोड मोबाईल नंबर, ईमेल सहीत पोस्टाने दि.२ आक्टोबर २०२० पर्यत पाठवावे तसेच पुरस्कारासाठी पुस्तक पाठवणा-या सर्वांना पुस्तक मिळाल्याचे पत्र पाठवण्यात येईल तर
पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुस्तकाची माहिती निवड समितीच्या वतीने काँल करुन तसेच पत्राने कळवण्यात येणार असल्याचे संस्थेचे संचालक रामभाऊ लांडे यांनी म्हटले आहे

पुरस्काराचे नाव
१)सुभेदार मल्हारराव होळकर
राज्यस्तरीय साहित्य लेखन पुरस्कार २०२०,२)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संशोधन लेखन पुरस्कार २०२०,३)महाराजा यशवंतराव होळकर राज्यस्तरीय वारसा संवर्धन पुरस्कार २०२०,४) जहागीरदार भोजराज बारगळ राज्यस्तरीय कला पुरस्कार २०२०,५)स्व.रुस्तुमराव लांडे
राज्यस्तरीय संशोधक मित्र पुरस्कार २०२०.

२)वारसा संवर्धन करणारे व्यक्ती वा संस्था यांनी आपल्या कार्याचा अहवाल पाठवावा (यात ठराविक संवर्धन कार्याचे फोटो, बातमी कात्रण,पुरातत्व विभागाशी केलेला पत्रव्यवहार)

३)२०१७ ते २०२० या कालावधीत भारतीय संस्कृती, कला,वारसा संवर्धन, ऐतिहासिक व्यक्ती, वास्तुचे काढलेले स्वाक्षरी तारीख असलेले चित्र पाठवावे

४)वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकांनी आपल्या संशोधनाविषयाची संपूर्ण माहिती पाठवावी

पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृती चिन्ह,शाल,श्रीफळ असे असुन पुस्तकांचा उचित सन्मान व्हावा याकरिता हा पुरस्कार सोहळा आयोजित करीत आहोत यासाठी लेखक,साहित्यिक, कवी यांनी पुस्तके तर चित्रकारांनी चित्र व वारसा संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्थांनी
श्री रामभाऊ लांडे  , सुवर्ण सदन होळकर नगर अंबड,ता.अंबड जि.जालना-४३१२०४ (मो.क्रं-9421349586)
या पत्यावर अहवाल पाठवावे असे आवाहन करण्यात येत आहे.