Home जळगाव जळगाव रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर भेट

जळगाव रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर भेट

207

रावेर (शरीफ शेख)

कोरोना काळात प्रत्येकजण आप-आपल्या प्रमाणे सेवा करत आहे आणि ते चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्या पैकी आपल्या जळगाव शहरातील नामांकित इंजिनियर हबीब साहब आणि अब्दुल ट्रान्सपोर्ट चे मालक आणि सामाजिक कार्यकर्ते अनवर उस्मान सिक्कलगर यांनी स्वत: च्या खर्चाने‌ अल हिंद चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अल हिंद दवाखाना उमर कॉलनी, शिवाजी नगर मध्ये दि. 18/08/2020 रुग्णालयाच्या मागणीनुसार ऑक्सिजन सिलेंडर ची संख्या कमी असल्यामुळे आणि लहान ऑक्सिजन सिलेंडर असल्यामुळे रुग्णालयाच्या या समस्येवर मात करण्यासाठी मोठ्या ऑक्सिजन सिलेंडर भेट करण्यात आले.
हे रुग्णालय एका गरीब वसाहती मध्ये पाच वर्षापासून स्थापित आहे जेथे गोरगरिबांवर उपचार कमी खर्चा मध्ये आणि बऱ्याच सेवा विनामुल्य दिले जातात. गरिबांचे आशीर्वाद ही घेतले जातात.
सिलेंडर देता वेळी असलेले बरेच त्रस्त रुग्णांनी हबीब भाऊ व अनवर भाऊ यांना आशीर्वाद हि दिला. अल्लाह यांच्या कडून अशा प्रकार ची चांगली कामे करत राहो.
ऑक्सिजन सिलेंडर देण्याचा वेळी क्लिनिकचे प्रभारी डॉ. निकहत रोशन मेम, डॉ शोएब पटेल, अल हिंद चे अध्यक्ष अल्ताफ शेख, हबीब इंजिनियर साहब, अनवर उस्मान सिक्क्लगर यांची उपस्थिती होती.